‘शिक्षण व्यवस्थेत भारतीयत्वाची पुनःस्थापना करण्याची गरज’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘शिक्षण व्यवस्थेत भारतीयत्वाची पुनःस्थापना करण्याची गरज’
‘शिक्षण व्यवस्थेत भारतीयत्वाची पुनःस्थापना करण्याची गरज’

‘शिक्षण व्यवस्थेत भारतीयत्वाची पुनःस्थापना करण्याची गरज’

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : ‘‘भारतीय परंपरेतील ज्ञानाचे उत्तुंग शिखर गाठलेल्या विविध शास्त्रांचा इंग्रजी भाषेत अभ्यास करता येत नाही. भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी या शास्त्रांचा अभ्यास गरजेचा आहे. हा अभ्यास आणि संशोधन भारतीय भाषांमध्येच होऊ शकते. त्यासाठी शिक्षण व्यवस्थेत भारतीयत्वाची पुनःस्थापना करण्याची आवश्यकता आहे,’’ असे मत भारतीय भाषा समितीचे अध्यक्ष चमू कृष्ण शास्त्री यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात विद्या भारती उच्च शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय ज्ञान परंपरा उच्च शिक्षणातील दृष्टिकोन बदल’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्‌घाटन प्रसंगी शास्त्री बोलत होते. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, लेखक राधाकृष्ण पिल्लई, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित आदी मान्यवर उपस्थितीत होते. यावेळी डॉ. कुंटे, डॉ. सोनवणे यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आस्मा बागवान यांनी, तर सूत्रसंचालन डॉ. मेधाविनी वाटवे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94343 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..