बदनामीकारक व्हिडिओव्दारे सात कोटींच्या खंडणीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बदनामीकारक व्हिडिओव्दारे सात कोटींच्या खंडणीची मागणी
बदनामीकारक व्हिडिओव्दारे सात कोटींच्या खंडणीची मागणी

बदनामीकारक व्हिडिओव्दारे सात कोटींच्या खंडणीची मागणी

sakal_logo
By

पुणे, ता. २७ ः शारीरीक व मानसिक तंदुरुस्तीसाठी ऑनलाइन प्रशिक्षण देणाऱ्या एका कंपनीविषयी बदनामीकारक व्हिडिओ समाजमाध्यमावर अपलोड करून संबंधित कंपनीच्या संचालकांकडे सात कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अमन दुग्गल (वय २८, रा. कोरेगाव पार्क) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विमाननगर येथील एका ३६ वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली. हा प्रकार २७ जून २०२१ ते २ जुलै २०२२ दरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी काम करणारी कंपनी आहे. त्यांचे एक मोबाईल ॲप असून त्यावर नागरिक शारीरीक व मानसिक तंदुरुस्तीसाठी प्रशिक्षण घेतात. त्यांच्या कंपनीला ड्रीम कॅपिटल व एलिशन पार्क या कंपनीने अर्थपुरवठा केला आहे. त्यामुळे आरोपी अमन दुग्गल याने फिर्यादी यांच्याबाबत युट्युबवर बदनामीकारक व्हिडिओ टाकून त्यांची बदनामी करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने चार कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली. त्यानंतर त्याने व्हिडिओ युट्युब व इन्स्टाग्रामवर अपलोड केला. ‘‘पैसे दिले नाही तर हा आकडा वाढत जाईल. जुलैमध्ये पाच कोटी होईल. ऑगस्टमध्ये सहा कोटी आणि सप्टेंबरमध्ये सात कोटी होइल. ते पैसे तुला माझ्या कंपनीच्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करावे लागतील. ते पैसे दिले नाही तर तुला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,'''' अशी धमकी दिली. फिर्यादी यांनी पैसे न दिल्याने २० ऑगस्ट रोजी त्याने युट्युबवर पुन्हा एक व्हिडिओ अपलोड केला. त्या व्हिडिओमध्ये फिर्यादीच्या प्रतिष्ठेवर आणि व्यक्तीमत्वावर वाईट शब्दांत हल्ला केला. या त्रासाला कंटाळून त्यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94354 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..