गुरूवर्य पुरस्कारांची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुरूवर्य पुरस्कारांची घोषणा
गुरूवर्य पुरस्कारांची घोषणा

गुरूवर्य पुरस्कारांची घोषणा

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ ः क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मरणार्थ ‘गुरूवर्य पुरस्कारां’ची घोषणा करण्यात आली आहे. क्रांतीगुरू लहूजी साळवे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (ता. ४) पर्वती येथील सुपर्ण हॉल अरणेश्‍वर येथे पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. भटक्या विमुक्तांसाठी कार्य करणारे गिरीष प्रभुणे यांच्या हस्ते संध्याकाळी चार वाजता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती ॲड. चेतन कसबेकर यांनी सांगितले. मेघना जोशी, अनुराधा बोरखे, मनिषा गायकवाड, राजश्री ढोबळे, अनिता गायकवाड, अनुराधा पुंडलिक, डॉ. धनंजय भिसे, रेखा पोळ आणि माधवी पुंडलीक यांना गौरविण्यात येणार आहे.

ब्रिज कौशल्य मेळाव्याला प्रतिसाद
पुणे, ता. ३१ ः महाराष्ट्र मंडळ येथे `ब्रिज २०२२’ या कौशल्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उद्योग आणि विद्यार्थ्यांना जोडणाऱ्या या मेळाव्याला पालकही उपस्थित होते. प्रॅक्टिकल एज्युस्केल्सच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थित होते. तसेच आयसीएआयचे उपाध्यक्ष राजेश अग्रवाल, मॅनेजमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप तुपे, संगणक तज्ज्ञ डॉ. दिपक शिकारपूर, एअर मार्शल भूषण गोखले, संस्थेचे अध्यक्ष सन्मित शहा आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94406 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..