पर्वती उद्यान आरक्षणात पुणे पालिकेकडून घोळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्वती उद्यान आरक्षणात 
पुणे पालिकेकडून घोळ
पर्वती उद्यान आरक्षणात पुणे पालिकेकडून घोळ

पर्वती उद्यान आरक्षणात पुणे पालिकेकडून घोळ

sakal_logo
By

पुणे, ता. २८ : पर्वती येथील सुमारे १६ एकरावरील उद्यानाच्या (पार्क) आरक्षणाबाबत महापालिकेच्या स्तरावर गोंधळ असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून समोर आले आहे. या दाव्यात प्रतिज्ञापत्र सादर करताना महापालिका प्रशासनाकडून वारंवार भूमिका बदलण्यात आली असल्याचे त्यातून दिसून आले आहे. तसेच महापालिकेने सादर केलेली प्रतिज्ञापत्रे आणि प्रत्यक्षात जागेवरील परिस्थिती वेगळी असल्याची माहिती समोर आली आहे.

पर्वती येथील सर्व्हे नंबर ५१७ (भाग) आणि ५२३ (भाग) या सोळा एकर जागेवरील उद्यानाचे आरक्षण रद्द करत ती जागा सर्वोच्च न्यायालयाने निवासी केली. त्याचबरोबर जागा मालकास प्रतिवर्ष १ कोटी या प्रमाणे १८ कोटी रुपये भरपाई देण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. या निकालामुळे महापालिका प्रशासन अडचणीत आले आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालात महापालिका प्रशासनाने मांडलेली बाजू आणि सादर केलेले प्रतिज्ञापत्र याचा सविस्तर उल्लेख केला आहे. त्यातून ही गोष्ट समोर आली आहे.

उद्यान आरक्षणाच्या जागेवर पाण्याचा टाक्या आहेत, असे प्रतिज्ञापत्र एकदा महापालिकेने न्यायालयापुढे सादर केले. तर याच दाव्यात प्रत्यक्षात जागेवर काहीच नाही, असेही एकदा प्रतिज्ञापत्र सादर केले असल्याचे आढळून आले आहे. प्रत्येकवेळी महापालिकेने अशी वेगवेगळी भूमिका का घेतली, प्रत्यक्षात मात्र या जागेवर झोपड्या झाल्या आहेत. न्यायालयाने स्वत:च्या अधिकारात ही जागा निवासी करीत जागामालकास परत केल्याने आता या जागेवर असलेल्या झोपड्या हटवून ती जागा मोकळी करून देण्याची जबाबदारी महापालिकेवर आली आहे. तसेच जमिनीच परत करण्याची तयारी महापालिकेने दर्शविली असल्याचे निकालात म्हटले आहे. वास्तविक हे म्हणणे मांडण्यापूर्वी महापालिकेने सर्वसाधारण सभेची मान्यता घेणे अपेक्षित होते. तेव्हा महापालिकेचे सभागृह अस्तित्वात होते. मात्र सर्वसाधारण सभेची मान्यता न घेता प्रशासनाने परस्पर हा निर्णय घेतला कसा, असा प्रश्‍नदेखील या निमित्ताने उपस्थित केला जाता आहे. एकूणच दाव्यामध्ये महापालिका प्रशासनाने वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेमुळे ‘तेलही गेले आणि तूपही गेले. हाती आले...’ अशी अवस्था झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94418 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..