सायकल प्युअरचे संपूर्ण गणेश चतुर्थी पूजा किट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायकल प्युअरचे संपूर्ण गणेश चतुर्थी पूजा किट
सायकल प्युअरचे संपूर्ण गणेश चतुर्थी पूजा किट

सायकल प्युअरचे संपूर्ण गणेश चतुर्थी पूजा किट

sakal_logo
By

पुणे, ता. २८ ः गणेशोत्सवासाठी यंदाही आपण सज्ज होत असताना, या उत्सवासाठी देशात सर्वाधिक विक्री होणारी ‘सायकल प्युअर अगरबत्ती’तर्फे गणेश चतुर्थी पूजा किट्स सादर करण्यात आले आहे.
या किटमध्ये वैदिक पद्धतीने प्रार्थना करण्यासाठी आणि गणेश चतुर्थी करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत. यामध्ये इको-फ्रेंडली विनायक मूर्ती, पूजेचे साहित्य, सामान आणि घरी पूजा करण्यासाठी कीटचा यामध्ये समावेश आहे. तसेच श्लोक आणि मंत्र पठणाचे व्हिडिओ आहेत जे आपल्या वैदिक परंपरेनुसार आहेत. याशिवाय मूर्तीतील तुळशीच्या बीजाबरोबरच धर्मग्रंथांचे मार्गदर्शन, वैदिक अभ्यासक या उत्सवाला वेगळे बनवतात.
किटबाबत सायकल प्युअर अगरबत्तीचे व्यवस्थापकीय संचालक अर्जुन रंगा म्हणाले, “सायकल प्युअरमध्ये आम्ही आमच्या वैदिक परंपरा आधुनिक संदर्भात जिवंत ठेवण्यासाठी सतत काम करतो. आम्ही भाविकांना परमात्म्याशी जोडण्यात मदत करण्यासाठी प्रार्थना आणि उत्सवाचा अनुभव वाढवण्याचा प्रयत्न करतो. वैदिक परंपरेनुसार गणेश चतुर्थी पूजा किट भाविकांसाठी परिपूर्ण किट आहे.’’ संपूर्ण गणेश चतुर्थी पूजा किट कंपनीच्या वेबसाईटवर तसेच मल्टी रिटेल स्टोअर्स, सुपरमार्केट आणि हायपरमार्केट येथे उपलब्ध आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94498 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..