क्राईम (दोन बातम्या) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम (दोन बातम्या)
क्राईम (दोन बातम्या)

क्राईम (दोन बातम्या)

sakal_logo
By

बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
पुणे, ता. २८ ः पुणे-नगर महामार्गावरील केसनंद फाट्याजवळ रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला भरधाव बसने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री साडे आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. लखन महादेव काळे (वय ३०, रा. वाघोली) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. त्यानुसार अज्ञात बस चालकावर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत लखन यांची पत्नी सीमा काळे यांनी फिर्याद दिली आहे.

कोंढवा बुद्रूक येथे नवविवाहितेची आत्महत्या
पुणे, ता. २८ ः सासरच्या जाचाला कंटाळून एका नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सुधाराणी संदीप वाघे (वय २४, रा. कोंढवा-बुद्रूक) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात पती संदीप नामदेव वाघे तसेच सासू व इतर एकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सुधाराणी यांचा भाऊ सिद्धलिंग कुसनेरे (वय १९, रा. कर्नाटक राज्य) यांनी तक्रार दिली आहे. सुधाराणी व संदीप यांचा मार्च २०२२ मध्ये विवाह झाला होता. जाचाला कंटाळून सुधाराणी यांनी गळफास लावून आत्महत्या केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94587 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..