गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी रविवार पेठेत गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी रविवार पेठेत गर्दी
गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी रविवार पेठेत गर्दी

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी रविवार पेठेत गर्दी

sakal_logo
By

पुणे, ता. २८ ः गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पुणे शहरातील भाविकांना आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आस लागली आहे. गणरायाचे बुधवारी (ता. ३१) आगमन होत असून, गणेशोत्सवाच्या आधीचा आज शेवटचा रविवार होता. त्यामुळे शहरात विशेष करून रविवार पेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. परिणामी, परिसरात वाहतूक कोंडी झाली.

रविवार पेठेत आकर्षक मखर उपलब्ध असून, ते खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली. गणरायाच्या आगमनानिमित्त आरास करण्यासाठी विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मखर सजावट, पानाफुलांच्या माळा, विद्युत रोषणाई अशा वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. प्लास्टिक बंदीमुळे कागदी, क्रेपपासून तयार केलेल्या फुलांच्या माळा, फुलांची कमान, पानांच्या वेली, विविध प्रकारच्या विद्युत रोषणाईचे तोरण ग्राहक विकत घेत आहेत. याशिवाय लाल, पिवळ्या, हिरव्या, गुलाबी अशा रंगीबेरंगी फुलांच्या माळा आणि हिरव्या वेलीसारख्या माळा ग्राहकांकडून खरेदी केल्या जात आहेत.
फोटो क्र. ८७४७९

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94596 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..