पावसाचे पुनरागमन शक्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाचे पुनरागमन शक्य
पावसाचे पुनरागमन शक्य

पावसाचे पुनरागमन शक्य

sakal_logo
By

पुणे, ता. २८ ः विदर्भापासून आंध्रप्रदेशपर्यंत सक्रिय असलेला कमी दाबाचा पट्टा आणि मॉन्सूनच्या सक्रिय स्थितीमुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाचे पुनरागमन होण्याचे संकेत आहे. सोमवारी (ता. २९) दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पुण्यासह राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. यातच उघडीप दिलेला पाऊस पुनरागमन करण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे कायम आहे. बिहार आणि परिसरावर, उत्तर प्रदेश, तसेच केरळ परिसरावर वेगवेगळ्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत. विदर्भापासून आंध्र प्रदेशपर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. अंदमान समुद्रापासून तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
पावसाची उघडीप, अंशतः ढगाळ हवामान, स्वच्छ सूर्य प्रकाश यामुळे राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. एखाद दुसऱ्या ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. सोमवारी (ता. २९) मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांसह विदर्भातील जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडीप राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

पुण्यात ढगाळ हवामान ः
शहर व परिसरात रविवारी पावसाने उघडीप घेतली होती. मात्र उन्हाचा चटका आणि उकाड्यातही वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी (ता. २९) आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आणि तुरळक ठिकाणी अति हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94600 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..