‘रेल्वे मार्गावर कोणी आढळून आल्यास तत्काळ कळवा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘रेल्वे मार्गावर कोणी आढळून आल्यास तत्काळ कळवा’
‘रेल्वे मार्गावर कोणी आढळून आल्यास तत्काळ कळवा’

‘रेल्वे मार्गावर कोणी आढळून आल्यास तत्काळ कळवा’

sakal_logo
By

पुणे, ता. २८ : रेल्वे मार्गावर अनेकदा काही व्यक्ती जखमी अवस्थेत अथवा मृत अवस्थेत आढळून येतात. तेव्हा कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ त्याची माहिती नियंत्रण कक्षाला कळवावी. तसेच ड्यूटी संपल्यावर त्याचा अहवाल देखील द्यावा, अशा सूचना मध्य रेल्वेचे क्लेम विभागाचे उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक के. जयशंकर यांनी दिल्या.
पुणे विभागाच्या डीआरएम कार्यालयात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी के. जयशंकर, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक डॉ स्वप्नील नीला यांच्यासह कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. यावेळी जयशंकर म्हणाले, काही अपघातात प्रवाशांचा मृत्यू होतो. अशा वेळी त्याचे कुटुंबीय क्लेम करतात. त्यावेळी सर्व कागदपत्रे योग्य असणे गरजचे आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अशी व्यक्ती पडलेली पहिली, तर तर त्या सेक्शनची नोंद व्यवस्थित करणे, तसेच कामे देखील बारकाईने करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी लोको पायलट, स्टेशन मास्तर, यातायात निरीक्षक, गार्ड, वाणिज्य निरीक्षक, वाणिज्य लिपिक आदी कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94612 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..