विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्रावर व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्रावर व्याख्यान
विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्रावर व्याख्यान

विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्रावर व्याख्यान

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : मराठवाडा मित्र मंडळ कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान विभागात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्राचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी धनश्री घारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील दररोजचे तास, प्रयोगशाळा, बारावीच्या परीक्षेची तयारी, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा यामुळे विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. अशात विद्यार्थ्यांची दैनंदिन शैक्षणिक आव्हाने सुलभ करण्यासाठी काय करावे, याबाबत घारे यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ‘‘विद्यार्थी आपण हुशार, मध्यम किंवा आपल्याला काही येतच नाही, असा समज करून घेतात. परंतु हे काही खरे नाही. कारण मेंदूची कार्य करण्याची प्रक्रिया किंवा वाढ ही आयुष्यभर सतत चालणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांनी वाढीची मानसिकता ठेवावी. सगळ्यांना २४ तास हा सारखाच वेळ असतो. आपल्या कामांची यादी विद्यार्थ्यांनी लिहून ठेवली, तर आपला मेंदू रिकामा राहून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने वेळेचे व्यवस्थापन करता येईल.’’
विद्यार्थ्यांनी व्यायाम करणे, सूर्यप्रकाश अनुभवणे, हळदीचे सेवन करणे याचे महत्त्व घारे यांनी पटवून दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्चना कामठे यांनी केले. तर विज्ञान विभागाच्या समन्वयक प्रा. नेहा कट्टी, प्राचार्य देविदास गोल्हार यांनीही मार्गदर्शन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94685 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..