वादविवाद स्पर्धेचे पारितोषिक वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वादविवाद स्पर्धेचे पारितोषिक वितरण
वादविवाद स्पर्धेचे पारितोषिक वितरण

वादविवाद स्पर्धेचे पारितोषिक वितरण

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : आयकर विभाग (पुणे) आणि सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ यांच्या वतीने आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस आणि वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धांमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातील महाविद्यालयांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. या पारितोषिक वितरण समारंभात प्रिन्सिपॉल चीफ कमिशनर प्रवीणकुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर सिंबायोसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, संजीवनी मुजुमदार यांसह आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94724 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..