अकरावीसाठी ४२ टक्के प्रवेश निश्‍चित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकरावीसाठी ४२ टक्के प्रवेश निश्‍चित
अकरावीसाठी ४२ टक्के प्रवेश निश्‍चित

अकरावीसाठी ४२ टक्के प्रवेश निश्‍चित

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : राज्यात इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतंर्गत (कॅप) आतापर्यंत केवळ ४१.१५ टक्के प्रवेश झाले आहेत. या प्रवेश फेऱ्यांतर्गत एकूण चार लाख ४७ हजार १८० जागांपैकी एक लाख ८४ हजार ४० जागांवर आतापर्यंत प्रवेश निश्चित केले गेले. या प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी सध्या सुरू आहे. कॅप प्रवेश फेऱ्यांसह कोट्यांअंतर्गत प्रवेश असे एकूण जवळपास ४२.५९ टक्के प्रवेश आतापर्यंत झाले.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नागपूर, नाशिक आणि अमरावती महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत राज्यात एकूण तीन लाख ३२ हजार ६६२ जागा रिक्त असून त्यातील ‘कॅप’ प्रवेश फेरीतील दोन लाख ६३ हजार १४० जागा रिक्त आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील ‘कॅप’ फेरीअंतर्गत ९२ हजार ७४९ जागांपैकी ३७ हजार ६३० जागांवर प्रवेश झाले आहेत. अद्याप ५५ हजार ११९ जागा रिक्त आहेत. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत एकूण एक लाख पाच हजार ७३८ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

महापालिका क्षेत्र : कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या : प्रवेश क्षमता (कॅप/एकूण) : झालेले प्रवेश (कॅप/एकूण) : रिक्त जागा (कॅप/एकूण)
मुंबई : १,०१५ : २,७२,६९०/३,७१,२७५ : १,०९,९१५/१,५७,०२१ : १,६२,७७५ /२,१४,२५४
पुणे, पिंपरी-चिंचवड : ३०८ : ९२,७४९/१,०९,७९० : ३७,६३०/४५,६२० : ५५,११९/६४,१७०
नागपूर : २०४ : ४५,४८८/५५,८०० : १८,६३३/२३,३०१ : २६,८५५ /३२,४९९
नाशिक : ६३ : २३,३६९/२६,४८० : ११,७१७/१३,११३ : ११,६५२/१३,३६७
अमरावती : ६५ : १२,८८४/१६,१९० : ६,१४५ /७,८१८ : ६,७३९/८,३७२

‘कॅप’अंतर्गत प्रवेशाचा आढावा
तपशील : कॅप फेरी : एकूण जागा
प्रवेश क्षमता : ४,४७,१८० : ५,७९,५३५
झालेले प्रवेश : १,८४,०४० : २,४६,८७३
रिक्त जागा : २,६३,१४० : ३,३२,६६२

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94772 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..