क्षण बहराचे ः रमणीय अशा गेंद वनस्पतीवरील आगळे संशोधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्षण बहराचे ः रमणीय अशा गेंद वनस्पतीवरील आगळे संशोधन
क्षण बहराचे ः रमणीय अशा गेंद वनस्पतीवरील आगळे संशोधन

क्षण बहराचे ः रमणीय अशा गेंद वनस्पतीवरील आगळे संशोधन

sakal_logo
By

क्षण बहराचे ः
रमणीय अशा गेंद वनस्पतीवरील आगळे संशोधन
नीला शर्मा
गवत या कुळातील नव्हे, पण त्याच्या जवळपासची अशी गेंद (एरिओकोलोन) या वनस्पतीची खास ओळख सांगण्यात येते. हिच्या जगभरात आढळणाऱ्या ४०० प्रजातींपैकी भारतात ११० प्रजाती सापडतात. यापैकी संपूर्ण देशभर फिरून ५५० नमुने पुण्यातील डॉ. अश्विनी दारशेतकर या तरुण संशोधिकेने गोळा करून त्यांवर अभ्यास चालवला आहे.

वेताळ टेकडीवरील एआरएआय परिसरातही गेंद या वनस्पतीच्या तीन प्रजाती सापडल्याचे सांगत अश्विनी म्हणाल्या, "या वनस्पतीच्या प्रजातींवर फारसा अभ्यास आपल्याकडे झालेला नाही. त्यामुळे तिच्याबद्दलचे गूढ अजून उकललेले नाही. भारतात सापडलेल्या या वनस्पतीचे साठ टक्के प्रमाण महाराष्ट्रात आहे. पश्चिम घाटातील डोंगर पठारांवर तसेच कोंकणातील सड्यांवर हिची विपुलता बघायला मिळते. गेंदच्या सत्तर टक्के प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत. जगभरातील प्रजातींपैकी एकचतुर्थांश आपल्या देशात असतानाही गेंद वनस्पती तशी दुर्लक्षितच राहिली आहे. गवतापेक्षा ती वेगळी ओळखणे अवघड जाते. हिच्या अनेक प्रजातींची फुले तर सूक्ष्मदर्शकातून निरीक्षण केल्याशिवाय त्यांचे बारकावे कळतही नाहीत."

अश्विनी यांनी स्पष्ट केले की, विशिष्ट प्रकारच्या पठारांवरील नत्र कमी झाल्यावर गेंद उगवायला लागतात. ही उगवण जुलैच्या आरंभी सुरू होते. झुडपांना फुलोरा धरतो. सप्टेंबरपर्यंत जीवनचक्र पूर्ण होऊन ही वनस्पती कोमजून मरते. मग हिच्या जागी गवताचे कुरण वाढते. असेच आणखी काही गुणधर्म, वर्तणूक, उपयोग आदींचा अभ्यास झाला तर हिच्या गूढ, रमणीय विश्वाचे रहस्य उलगडेल. गेंदच्या काही प्रजातींमध्ये कर्करोग प्रतिबंधक औषधी घटक असल्याचे आढळले तर काहींमध्ये पोट व डोळ्यांचे विकार बरे करण्याचे गुणधर्म असल्याचे अभ्यासकांच्या निदर्शनाला आले आहे. आणखी कोणकोणत्या आजारांवर कुठल्या प्रजाती उपयुक्त ठरतील, याबाबत संशोधन गरजेचे आहे. ते केल्यास वनस्पतीच्या संवर्धनाला मदत होईल, अशी आशा वाटते. कारण या वनस्पतीच्या अनेक प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हिच्या उत्क्रांतीच्या अभ्यासातही मी रमते आहे.

नियतकालिकांत शोधनिबंध प्रसिद्ध
सध्या मी हेलिकेंथस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बांडगुळावर पोस्ट डॉक्टरल संशोधनपर अभ्यास करते आहे. जैवविविधतेसंबंधी अनेक प्रतिष्ठित नियतकालिकांमध्ये माझे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांची दखल ज्येष्ठ संशोधक व नव्या अभ्यासकांकडून घेतली गेली, याचे समाधान वाटते.

२) डॉ. अश्विनी दारशेतकर

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94795 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..