लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीबाबत न्यायालयात याचिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीबाबत न्यायालयात याचिका
लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीबाबत न्यायालयात याचिका

लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीबाबत न्यायालयात याचिका

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : विसर्जन मिरवणुकांच्या वेळी लक्ष्मी रस्त्यावरून प्रथम मानाचे पाच गणपती मंडळेच जातील. त्यानंतरच इतरांनी जावे हा रूढी-परंपरा व प्रथेचा भाग म्हणजे कायदा नाही. त्यामुळे इतर लहान गणेश मंडळांना विसर्जनासाठी लक्ष्मी रस्ता वापरण्यावर असणारी बंधने म्हणजे बेकायदेशीर व संविधानातील कलम १९ नुसार असलेले संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे, असा आरोप करणारी याचिका ‘बढाई समाज ट्रस्ट’चे मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

मानाच्या गणपतींच्या आधी ज्या मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणूक काढायची असेल त्यांना पोलिस आयुक्तांनी परवानगी द्यावी व तशी सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या याचिकेतून केली गेली आहे. ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली. विसर्जन मिरवणुकांमध्ये मानाच्या गणपती मंडळांनाच प्रशासन प्राधान्य देते, तर पहिल्या पाच मानाच्या गणपती मंडळांच्याद्वारे इतर मंडळांना तुच्छतेची वागणूक देण्यात येते, असे याचिकेत नमूद आहे. कायद्याच्या कुठल्या तरतुदीनुसार मानाच्या पाच मंडळांना प्रथम मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे, अशी विचारणा माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार पोलिस आयुक्त कार्यालयाला विचारली केली होता. याबाबत कोणताही लेखी कायदा किंवा नियम नसल्याचे त्यांना कळविण्यात आले होते. त्याचा उल्लेख याचिकेत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94966 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..