‘महा-ऊस नोंदणी’ शेतकऱ्यांसाठी उपयुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘महा-ऊस नोंदणी’ शेतकऱ्यांसाठी उपयुक्त
‘महा-ऊस नोंदणी’ शेतकऱ्यांसाठी उपयुक्त

‘महा-ऊस नोंदणी’ शेतकऱ्यांसाठी उपयुक्त

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : ‘‘शेतकऱ्यांना कारखान्यांकडे ऊस नोंदणीबाबत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी साखर आयुक्तालयामार्फत ‘महा-ऊस नोंदणी’ ॲप विकसित केले आहे, हे ॲप शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल,’’ असा विश्वास सहकार मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

साखर आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात ॲपच्या उद्‍घाटनप्रसंगी सावे बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार, साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संचालक प्रशासन उत्तम इंदलकर, संचालक अर्थ यशवंत गिरी आदी उपस्थित होते. ग्रामीण भागात ऊस नोंदणीबाबत तक्रारी येतात. उसाची तोड होण्याबाबत शेतकरी चिंतेत असतात. या ॲपच्या माध्यमातून उसाची नोंद होणार असल्यामुळे ऊस वेळेवर तुटण्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल. यामध्ये एका कारखान्याव्यतिरिक्त अजून दोन कारखान्यांचा पर्याय दाखल करण्याची सोय आहे. त्यामुळे ऊस तोडणीबाबत खात्री मिळेल, असा विश्वास सावे यांनी व्यक्त केला.

राज्यातील ऊस क्षेत्र, गाळप, इथेनॉल प्रकल्प, आसवनी, सहवीजनिर्मिती, बायोगॅस प्रकल्प, साखर कारखान्यांपुढील आव्हाने, उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी), साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) याबाबत त्यांनी आढावा घेतला. ज्या शेतकऱ्यांना कारखान्यात जाऊन ऊस नोंदणी करणे शक्य होत नाही, ते शेतकरी या मोबाईल ॲपमार्फत स्वत:च्या ऊस क्षेत्राची नोंद करू शकतात. त्यांच्या नोंदणीची माहिती ॲपमध्ये दिसेल. या ॲपमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या उसाची नोंदणी करणे शक्य होणार आहे, असे साखर आयुक्त गायकवाड यांनी सांगितले. बैठकीस साखर आयुक्तालयाचे सहसंचालक पांडुरंग शेळके, मंगेश तिटकारे, राजेश सुरवसे, संतोष पाटील यांच्यासह प्रादेशिक सहसंचालक, शेतकरी व शेती अधिकारी उपस्थित होते.

‘महा-ऊस नोंदणी’ॲप
‘महा-ऊस नोंदणी’ॲप गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी ॲपमध्ये ऊस लागवडीची जिल्हा, तालुका, गाव व गट नंबरनिहाय माहिती भरल्यावर ऊस क्षेत्राची माहिती भरावी. कोणत्या कारखान्याला ऊस नोंदणीसाठी कळवायचे यासाठी कारखान्यांचे तीन पर्याय भरता येतील. आयुक्तालय ही माहिती जवळच्या कारखान्याकडे पाठवून देईल. ॲपच्या माध्यमातून साखर आयुक्तालय कारखान्यांकडे ऊस नोंदणीची माहिती पाठवू शकेल.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95014 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..