पुण्यातील चार हजार लाभार्थी राहणार वंचित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील चार हजार लाभार्थी राहणार वंचित
पुण्यातील चार हजार लाभार्थी राहणार वंचित

पुण्यातील चार हजार लाभार्थी राहणार वंचित

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजनेसह विविध योजनेतील लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने वारंवार आवाहन करूनदेखील उत्पन्नाचे दाखले सादर न केल्यामुळे सुमारे चार हजारांहून अधिकांना अनुदान मिळण्यास अडचणी येणार आहे. शहरात या दोन्ही योजनेचे मिळून सुमारे सात हजारांहून अधिक लाभार्थी आहेत. त्यापैकी केवळ ४३ टक्के लाभार्थ्यांना हे अनुदान मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरातील निराधार नागरिकांना राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साह्य योजनेतंर्गत संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनेतंर्गत दरमहा पेन्शन दिली जाते. त्यासाठी दरवर्षी एक एप्रिलनंतर पात्र असलेल्या लाभार्थ्यांना नव्या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर लाभार्थ्यांना वर्षभर दरमहा अनुदान दिले जाते. या लाभार्थ्यांनी वेळेत उत्पन्नाचे दाखले सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले, तसेच त्यासाठी विशेष शिबिरांचेदेखील आयोजन करण्यात आले. परंतु लाभार्थ्यांकडून पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे पन्नास टक्क्याहून अधिक लाभार्थ्यांना या पेन्शनपासून वंचित राहावे लागणार असल्याचे समोर आले आहे.
------------------------
राज्य सरकारच्या या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना दरवर्षी एक एप्रिलला नवीन उत्पन्नाचा दाखल सादर करणे बंधनकारक आहे. वारंवार आवाहन करूनही शहरातील ४३ टक्केच लाभार्थ्यांकडून हे दाखले सादर करण्यात आले आहे. हे दाखले सादर करण्यासाठी मुदत संपुष्टात आली आहे. अद्यापही लाभार्थ्यांनी दाखले सादर केल्यास त्यांना पेन्शन लागू होऊ शकते. - रोहिणी शंकरदास, तहसीलदार
-----------
या आहेत योजना
- संजय गांधी निराधार अनुदान योजना
-श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्तिवेतन योजना
-इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना
-इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना
-इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना
-------------
शहरातील लाभार्थ्यांची आकडेवारी
----------------------
एकूण लाभार्थी- ७७५१
उत्पन्न दाखले सादर केलेल्या लाभार्थ्यांची संख्या- ३३६९
दाखले सादर न केलेल्या लाभार्थ्यांची संख्या- ४३८२
----------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95081 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..