मुलांच्या उत्साहात रंगली इको गणपती कार्यशाळा ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलांच्या उत्साहात रंगली 
इको गणपती कार्यशाळा !
मुलांच्या उत्साहात रंगली इको गणपती कार्यशाळा !

मुलांच्या उत्साहात रंगली इको गणपती कार्यशाळा !

sakal_logo
By

पुणे ः खरे तर रविवार हा सुटीचा दिवस. पण गेल्या रविवारी मुले आणि त्यांचे पालक सर्वजण बाप्पाच्या पर्यावरणपूरक मूर्ती साकारण्यात रमले. या निमित्ताने एक हजाराहून अधिक बाप्पाच्या मूर्ती घडविल्या गेल्या. प्रत्येक ठिकाण प्राचार्या, शिक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांनी यासाठी मोलाची मदत केली. कार्यशाळेसाठी आजोळ डे केअर, क्लारा ग्लोबल स्कूल आणि संडे सायन्स स्कूल हे प्रायोजक होते. कार्यशाळेसाठी स्ट्रोक्स फाउंडेशनच्या चेतन पानसरे, स्नेहल कुलकर्णी-जोगळेकर आणि टीमचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यशाळेच्या निमित्ताने आपली संस्कृती आणि पर्यावरण याची अनोखी सांगड घातली गेली, असे आजोळच्या संचालक मोनिका कुलकर्णी यांनी सांगितले.
‘सकाळ’ आयोजित गणपती आइडल मेकिंग वर्कशॅापला नेहमीप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळाला. लहानग्यांबरोबर ज्येष्ठ नागरिकांनीही गणपती मूर्ती बनवण्याचा आनंद घेतला. हे आमचे सहावे वर्ष आहे, असे क्लारा ग्लोबल स्कूलच्या प्राचार्या सारिका बाबर यांनी सांगितले.


फोटो
PNE22S87832
स्नगल्स वर्ल्ड प्री स्कूल मार्केट यार्ड, गुलटेकडी

PNE22S87833
पाठशाळा, पाषाण

PNE22S87837
स्नगल्स वर्ल्ड प्री-स्कूल, धानोरी

PNE22S87838
क्लारा ग्लोबल स्कूल, घोरपडी

PNE22S87839
पाठशाळा , बाणेर-बालेवाडी 

PNE22S87842
आजोळ, कोथरूड, गांधी भवन

PNE22S87844
ट्रीनिटी इंटरनॅशनल स्कूल , कोंढवा 

PNE22S87845
युनिव्हर्सल पब्लिक स्कूल, हडपसर

PNE22S87846
क्लारा ग्लोबल स्कूल, सिंहगड रस्ता

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95266 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..