तांब्याची पाने चोरल्याप्रकरणी एकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तांब्याची पाने चोरल्याप्रकरणी एकाला अटक
तांब्याची पाने चोरल्याप्रकरणी एकाला अटक

तांब्याची पाने चोरल्याप्रकरणी एकाला अटक

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : बंद कारखान्याचा छताचा पत्रा कापून आत घुसत दोन लाख ९० हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या धातूची पाने चोरल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला एक सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिला. मार्शल उमाकांत मोरे (वय १९, रा. कोंढवा बुद्रूक) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ५० वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. २३ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ६ ते २४ जुलै सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान सुखसागरनगर परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी मोरे याला ताब्यात घेत तपास केला असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95339 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..