चांदणी चौकात सेवावाहिन्या हलविण्यास सुरूवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चांदणी चौकात सेवावाहिन्या हलविण्यास सुरूवात
चांदणी चौकात सेवावाहिन्या हलविण्यास सुरूवात

चांदणी चौकात सेवावाहिन्या हलविण्यास सुरूवात

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : चांदणी चौकात सध्या अस्तित्वात असलेला जुना पूल पाडून नवीन चांदणी चौक उड्डाणपूल प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यादृष्टीने अस्तित्वातील ओव्हरपासवरील सेवावाहिन्या स्थलांतरित करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे, अशी माहिती एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली. दरम्यान, पुढील आठवड्यात सेवारस्ता वाहतुकीस खुला करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

पुणे शहरातील मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग वरील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन यांच्याशी चर्चा करून निघालेल्या निष्कर्षानुसार येत्या १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान अस्तित्वातील जुना अरुंद पूल पाडून महामार्ग सहापदरीकरण करण्याचे ठरले आहे. आता या प्रकल्पाला गती देण्यासाठी पुणे महानगरपालिका, संरक्षण विभाग व अन्य विभागांमार्फत अस्तित्वातील ओव्हरपास वरील पाणी पुरवठा, विद्युत वाहिनी आदी सेवा वाहिन्या स्थलांतरित करण्यासाठीचे काम सुरु झालेले आहे.

सुरू असलेल्या कामानुसार सध्या नवीन पुलाच्या बांधकामासाठी दोन्ही बाजूच्या अबेटमेंटच्या खोदकामाची तयारी सुरू करण्यात आली आहे. बऱ्याच दिवसापासून बंद असलेल्या वेदभवनासमोरील अस्तित्वात असलेल्या सेवारस्त्याच्या भरावाचे काम सुरू करण्यात आले आहे. महामार्गावरील सद्यःस्थितीतील चौपदरी रस्त्याचे सहापदरीकरण करण्यासाठीच्या रिटेनिंग वॉलचे (सीमाभिंत) व माती भरावाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

श्रृंगेरी मठासमोरील सेवारस्त्यावरील राडारोडा उचलून रस्ता वाहतुकीस खुला करण्यासाठीचे काम प्रगतिपथावर आहे. पुढील आठवड्यात सेवारस्ता वाहतुकीस खुला करण्यात येईल. मुळशी ते सातारा रॅम्पचे काम गतीने सुरू असून पुढील सात दिवसांत ते पूर्ण करण्याचे नियोजित आहे. महामार्गावरील वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत आवश्यक त्या ठिकाणी पोलिस विभागामार्फत आवश्यकतेनुसार वाहतूक मार्शलची नेमणूक करण्यात येत आहे, असेही कदम यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95381 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..