सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय पोषण अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय पोषण अभियान
सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय पोषण अभियान

सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय पोषण अभियान

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : पोषण अभियानांतर्गत सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील अंगणवाडी केंद्रे, सरकारी आणि निमसरकारी संस्थांसोबतच मोठ्या प्रमाणात लोकसहभाग घेण्यात येणार आहे.

पंतप्रधान कार्यालयाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम म्हणून २०१८ मध्ये महिला व बाल विकास विभागाअंतर्गत पोषण अभियानाची सुरवात करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमाअंतर्गत महिला व बालकाचे आरोग्य पोषण स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्यादृष्टीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षी पोषण महिन्यामध्ये महिला व स्वास्थ्य, बालक आणि शिक्षण- पोषणाबरोबर शिक्षण, लिंग संवेदनशीलता, जलसंधारण आणि व्यवस्थापन, आदिवासी भागातील महिला आणि मुलांसाठी पारंपरिक खाद्यपदार्थ या बाबींवर मुख्यत्वे भर देण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामधील १ हजार ४१३ अंगणवाड्यांच्या केंद्र स्तरावर विविध स्पर्धा, शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे बाल विकास प्रकल्प अधिकारी पी. बी. शिर्के यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95416 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..