आधार अद्ययावतीकरणासाठी प्रकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आधार अद्ययावतीकरणासाठी प्रकल्प
आधार अद्ययावतीकरणासाठी प्रकल्प

आधार अद्ययावतीकरणासाठी प्रकल्प

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ ः ‘‘दहा वर्षांपूर्वी काढलेल्या, परंतु माहिती अद्ययावत न झालेले आधारकार्ड अद्ययावत करण्याचा प्रायोगिक प्रकल्प हाती घेतला आहे. राज्यात मुंबई, पुणे आणि ठाणे जिल्ह्यात हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, नागरिकांनी आधारकार्डावरील माहिती अद्ययावत करावी,’’ असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आधार नोंदणीशी संबंधित यंत्रणांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे राज्य प्रकल्प व्यवस्थापक अभिषेक पांडे, अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, ‘बीएसएनएल’चे विक्री व व्यवस्थापन जिल्हा महाव्यवस्थापक सतीश आळंदकर उपस्थित होते.

सर्व संबंधितांना हा प्रकल्प यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. नागरिकांना आधार अद्ययावत करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी २७ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील नोंदणीकृत आधार ऑपरेटर्सची बैठक घेऊन त्यांना प्रकल्पाबाबत प्रशिक्षण दिले आहे.

आधार कार्ड हे विविध कामांमध्ये ओळखीसाठी महत्त्वाचे दस्तावेज म्हणून उपयोगात आणले जाते. अनेक सरकारी सेवा व सुविधांसाठी आधारचा उपयोग करण्यात येतो. बऱ्याचदा आधारकार्डावर नमूद पत्ता बदल झाल्याने तो अद्ययावत करण्याची आवश्यकता असते. नागरिक पुराव्यादाखल कागदपत्रे सादर करून आधारकार्डावरील तपशीलात बदल करू शकतात. ‘यूएआयडीएआय’ने ‘अपडेट डॉक्युमेंट’ नावाची नवी सुविधा तयार केली असून ‘माय आधार’ पोर्टलवर ती उपलब्ध करून दिली आहे. कोणत्याही आधार नोंदणी केंद्रावर माहिती अद्ययावत करता येणार आहे. आधार अद्ययावतीकरण ऐच्छिक स्वरूपाचे आहे.

देशातील ४० जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असून, त्यापैकी पुणे जिल्ह्याची निवड केली आहे. गेल्या १० वर्षांत आधार अद्ययावतीकरण न केलेल्या नागरिकांनी आधार अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95427 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..