एमआयटीत स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमआयटीत स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची सांगता
एमआयटीत स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची सांगता

एमआयटीत स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची सांगता

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ः पश्चिम विभागाची स्मार्ट इंडिया हॅकाथॉन हार्डवेअर ॲडिशन नुकतीच यशस्वीपणे पार पडली. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा इनोव्हेशन सेल, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन आणि एमआयटी एडीटी विद्यापीठ यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्‍घाटन नीति आयोगाचे विशेष अधिकारी डॉ. के. व्यंकटनारायण, एमआयटी एडीटीचे कुलगुरू डॉ. मंगेश कराड व कॅपजेमिनी कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष मनीष मेहता यांच्या हस्ते झाले. सोमवारी (ता. २९) या स्पर्धेची सांगता झाली. स्पर्धेच्या ग्रँड फिनालेमध्ये १६० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या सर्जनशील कल्पनांचा वापर करून वास्तविक जीवनातील गंभीर सामाजिक समस्यांवर उपाय या वेळी शोधण्यात आले. स्वास्थ्य, खेळ, वारसा आणि संस्कृती, मेड टेक, जैवतंत्रज्ञान, हेल्थ टेक, कृषी, फूड टेक, ग्रामविकास आणि पुर्नवापर क्षेत्राशी संबंधित समस्यांवर संघांनी काम केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95720 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..