पावसाचा जोर ओसरल्यामुळे ‘खडकवासला’तून विसर्ग बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाचा जोर ओसरल्यामुळे ‘खडकवासला’तून विसर्ग बंद
पावसाचा जोर ओसरल्यामुळे ‘खडकवासला’तून विसर्ग बंद

पावसाचा जोर ओसरल्यामुळे ‘खडकवासला’तून विसर्ग बंद

sakal_logo
By

खडकवासला, ता. ३१ : खडकवासला धरण साखळीतील चारही धरणे पूर्ण भरली आहेत. परंतु, सध्या पावसाचा जोर ओसरल्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग बंद केला आहे. खडकवासला धरणातून यंदा आतापर्यंत मुठा नदीत १५.२१ टीएमसी पाणी सोडले आहे.
पानशेत, वरसगाव व टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. खडकवासला येथे मंगळवारी दिवसभरात ११ मिलिमीटर पाऊस झाला. पानशेत धरणातून वीज निर्मितीसाठी संध्याकाळी ६५० क्युसेक पाणी सोडले जात आहे. वरसगाव धरणातून वीज निर्मितीसाठी सोडलेले पाणी बुधवारी दुपारी दोन वाजता बंद केले आहे.
टेमघर धरण ३.६६ टीएमसी म्हणजे ९८.६४ टक्के भरले आहे. या धरणातून विसर्ग सुरु नाही. खडकवासला धरणातून मुठा नदीतील विसर्ग बंद केला आहे. परंतु, सिंचनासाठी मुठा उजव्या कालव्यातून १००५ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95777 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..