दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा आज निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

10th-12th supplementary examination result today
दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा आज निकाल

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा आज निकाल

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. २) दुपारी एक वाजताच्या सुमारास www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील आणि या माहितीची प्रत (प्रिंट आउट) विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.

दहावीची पुरवणी परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान, तर बारावीची पुरवणी परीक्षा २१ जुलै ते २४ ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली होती. ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून पुरवणी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांनी संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन यासाठी ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून स्वत: किंवा शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध केली गेली आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी ३ ते १२ सप्टेंबरपर्यंत, छायाप्रतीसाठी ३ ते २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येतील.

जुलै-ऑगस्ट २०२२ पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पूनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक राहील. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल, त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

येथे करता येईल अर्ज
दहावी : http://verification.mh-ssc.ac.in
बारावी : ‘http://verification.mh-hsc.ac.in

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95981 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..