पुण्यातील नेत्रदानाची दृष्टी अंधूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील नेत्रदानाची दृष्टी अंधूक
पुण्यातील नेत्रदानाची दृष्टी अंधूक

पुण्यातील नेत्रदानाची दृष्टी अंधूक

sakal_logo
By

नेत्रदानाकडे पहा
वेगळ्या नजरेने!
कोरोनावंतरही प्रमाणात अद्याप वाढ नाही

पुणे, ता. १ : शहरात कोरोनामध्ये कमी झालेले नेत्रदानाचे प्रमाण अद्यापही वाढत नसल्याने निरीक्षण वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले. त्यामुळे पुण्यातील नेत्रदानाबद्दलची दृष्टी अंधूक होत असल्याचे दिसते.
कोरोनापर्यंत पुणे नेत्रदानात मोठे योगदान करत होते. मात्र, कोरोना उद्रेकानंतर आता हा कल बदलत असल्याचे दिसते. कोरोना उद्रेक कमी होण्याबरोबरच नेत्रदान करणाऱ्यांचे प्रमाणही वेगाने कमी झाले असल्याची माहिती शहरातील नत्ररोग तज्ज्ञांनी दिली. नेत्रदान याचा अर्थ मृत व्यक्तीच्या शरीरातील पूर्ण डोळा काढून घेणे असा होत नाही. तर, त्याच्या नेत्रपटलातील पेशी काढून घेतल्या जातात. मृत व्यक्तीचा डोळा तसाच ठेवला जातो. त्यामुळे मृत व्यक्तीचा चेहरा कोणत्याही प्रकारे विद्रूप होत नाही, असे जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश रोकडे यांनी स्पष्ट केले.

कारण काय?
१. शहरात ३४ नेत्रपेढ्या आहेत. पण, त्यापैकी सक्रिय नेत्रपेढ्यांची संख्या फक्त १० आहे. त्यामुळे नेत्र संकलनाची मजबूत व्यवस्थेला हादरा बसल्याने नेत्रसंकलन कमी झाले.
२. कोरोनानंतर नेत्रदानासाठी मृत व्यक्तीचे नातेवाईक पुढे येत नाहीत.
३. घरी जाऊन मृत व्यक्तीचे नेत्रसंकलन कोरोना उद्रेकात बंद पडले. ते पुन्हा सुरू झाले नाही.
४. कोरोनामध्ये वैद्यकीय शाखेचे प्रवेश झाले नसल्याने निवासी डॉक्टर मिळाले नाहीत. त्यातून रुग्णालयातील डॉक्टरांची संख्या कमी झाली. त्याचा फटका नेत्रदानाला बसला.
५. कोरोनाच्या सुरवातीला नेत्रदानावर निर्बंध होते.

नेत्रपेढ्यांनी काय करावे?
शहरातील बहुतांश नेत्रपेढ्या कोणत्याही रुग्णालयाशी संलग्न नाहीत. आतापर्यंत या प्रत्येकाने स्वतंत्रपणे कार्य केले आहे. त्यामुळे नेत्रपेढ्यांनी शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांशी नेत्रदानासाठी समन्वय करार करणे, ही काळाची गरज आहे. तेथील अतिदक्षता विभागातील अत्यवस्थ रुग्णाच्या नातेवाईकांचे समुपदेशन करून मरणोत्तर नेत्रदानासाठी त्यांची मानसिकता तयार करण्याची प्रक्रिया आत, नेत्रपेढ्यांनी सुरू केली पाहिजे.

जनजागृतीची गरज
मृत्यू पश्चात नेत्रदान करून तुम्ही अंध लोकांना दृष्टी देऊ शकता, या बद्दल जनजागृती हाच ही चळवळ पुन्हा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक घटक आहे. मृत नातेवाइकाची नेत्रदानाची इच्छा ही या चळवळीचा पाया आहे. त्यामुळे तेथे जनजागृती केली पाहिजे, असे डॉ. रोकडे यांनी स्पष्ट केले.

डोळ्यांची गरज आणि दाते
नेत्रदान ही चळवळ झाली पाहिजे. कारण, डोळ्यांच्या प्रतीक्षेत असलेले लाखो रुग्ण आहेत. पण, प्रत्यक्षात आठ ते दहा हजार नेत्र संकलन होते.

पुण्यात कोरोना उद्रेकात नेत्रदानाचे प्रमाण खूप कमी झाले होते. ते आता पुन्हा हळूहळू वाढत आहे. पण, हा वाढीचा वेग मंद असल्याने नेत्रदानाचा टप्पा पुन्हा गाठणे हे आपल्यासाठी आव्हानात्मक आहे. मृत व्यक्तीचे नेत्रदान करण्यासाठी नातेवाइकांनी पुढे येण्याची प्रकर्षाने गरज निर्माण झाली आहे.
- डॉ. आदित्य केळकर, नेत्रतज्ज्ञ, एनआयओ

जनजागृती आणि नेत्रदानाचा अर्ज भरून देण्याबरोबरच जवळच्या नातेवाइकाला याची कल्पना देणे आवश्यक असते. कारण, मरणोत्तर सर्व निर्णय मृत व्यक्तीच्या जवळचे नातेवाईक घेत असतात. त्यांच्यापर्यंत नेत्रदानाचे महत्त्व पोचविले पाहिजे.
डॉ. प्रकाश रोडके, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक, पुणे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96011 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..