जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे गजाआड
जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे गजाआड

जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे गजाआड

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः पूर्ववैमान्यसातून तरुणाला दगडाने व लोखंडी सळईने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर परिसरातील इंद्रनील नगर येथे घडली होती.

सागर गुडेकर (वय २२), सागर पाटोळ (वय ३० रा. लोणी काळभोर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी उल्फत शेख (वय ३२, रा. घोरपडे वस्ती, लोणी काळभोर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे पती अब्दुल हमीद शमशुद्दीन शेख (वय ३५) व संशयित आरोपी यांच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी भांडणे झाली होती. या रागातून संशयित आरोपींनी एकमेकांशी संगनमत करून फिर्यादीचे पती शेख यांना ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोरमधील इंद्रनीलनगर येथे लोखंडी सळई व दगडाने मारहाण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत फिर्यादीचे पती गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक हनुमंत तरटे या घटनेचे तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96042 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..