फिरत्या हौदांसाठी १.४१ कोटींचा खर्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फिरत्या हौदांसाठी १.४१ कोटींचा खर्च
फिरत्या हौदांसाठी १.४१ कोटींचा खर्च

फिरत्या हौदांसाठी १.४१ कोटींचा खर्च

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः पाच दिवसांच्या फिरत्या गणेश विसर्जन हौदांसाठी महापालिका तब्बल १ कोटी ४१ लाख रुपये मोजणार आहे. प्रशासकांनी मंगळवारी सिद्धी ॲडव्हर्टायझिंग या ठेकेदार कंपनीची ४.९९ टक्के अशी वाढीव दराने आलेली निविदा मान्य केली.

यंदा कोरोनाचे निर्बंध नसल्याने उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. विसर्जनासाठी महापालिकेकडून नदीकाठी हौद, टाक्यांची व्यवस्था केली जाते. तसेच इतर भागातही लोखंडी टाक्या उपलब्ध करून देऊन विसर्जन केले जाते. त्याबरोबरच महापालिका प्रशासनाने यंदा १५० फिरत्या हौदांसाठी तब्बल १ कोटी ३५ लाख रुपयांची निविदा काढली. महापालिकेने निविदा मान्य केली असली तरी हे फिरते हौद पाचव्या दिवसांपासून उपलब्ध होणार आहेत. १५० फिरत्या हौदांसाठी पाच दिवसांसाठी प्रत्येकी तब्बल ९४ हजार रुपये महापालिका मोजणार आहे.

गेले अनेक वर्ष नदीच्या घाटावर विसर्जन हौदामध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते, पण यंदा हे हौद विसर्जनासाठी उपलब्ध करण्यात आले नाहीत. नदीकाठचे हौद सुरू केले तर नदीमध्येही विसर्जनाचे प्रमाण वाढेल, त्यातून नदीचे प्रदूषण होईल. त्यामुळे नदीकाठच्या हौदाऐवजी शहरात ठिकठिकाणी लोखंडी टाक्यांत विसर्जनाची सोय केली आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे.

जीपीएसद्वारे ट्रॅकिंग

घनकचरा विभागाच्या उपायुक्त आशा राऊत म्हणाल्या,‘‘१५० फिरत्या हौदाची निविदा आज मान्य केली असून, ४.९९ टक्के दराने ती जास्त आली आहे. फिरते विसर्जन हौद शहरात कुठे कुठे फिरले याचे जीपीएस ट्रॅकिंग केले जाणार आहे. तसेच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाचे विभागीय आरोग्य निरीक्षकांचे या गाडीवर नियंत्रण असेल. शिवाय घनकचरा विभागाचे पाच कनिष्ठ अभियंता, २ कार्यकारी अभियंताही यावर लक्ष ठेवणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96072 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..