अवती भवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवती भवती
अवती भवती

अवती भवती

sakal_logo
By

गणेशोत्सवात महिला, बालकांच्या
सुरक्षेला प्राधान्य द्या : निलम गोऱ्हे
पुणे, ता. १ ः दोन वर्षांनंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गणेशोत्सवात महिला व बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केले. कोरोनाचा कालावधी संपला असला तरी त्याच्‍या काही आठवणी मात्र प्रत्येकाच्याच मनात आजही घर करून आहेत. यंदाचा गणेशोत्सव हा पर्यावरण पूरक असावा अशी भावना सर्वांचीच आहे. महिलांच्या सुरक्षेला आवाहन देणाऱ्या गोष्टी समाजात घडत आहेत. पोलिसांवर या घटनांचा ताण असतो. अशा वेळी सर्व समाजाने पोलिसांना सहकार्य करावे. तसेच गणेशोत्सवात सामाजिक सुरक्षा राखण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन गोऱ्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले.

जलसा कलावंत नाना गायकवाड यांची जन्मशताब्दी साजरी
पुणे, ता. १ ः नालंदा सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि गायकवाड परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ जलसा कलावंत बाबूराव तथा नाना गेणूजी गायकवाड (नसरापूरकर) यांची जन्मशताब्दी साजरी केली. यावेळी विजय जाधव, प्रा. वृक्षाली रणधीर, डॉ. शांतीपाल ओहोळ यांचा सत्कार केला. माजी आमदार ॲड. जयदेवराव गायकवाड, ज्ञानेश्वर मोळक, नामदेव घाडगे, वहीद बियाबानी, प्रमोद वाघमारे आदी उपस्थित होते. आयोजन शेखर शेंडे, श्रुतिका ओव्हाळ, संजय वाघमारे, हर्षल चव्हाण, भाऊसाहेब कांबळे यांनी परिश्रम घेतले. संजय गायकवाड यांनी आभार मानले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.

भारतीय लोकविकास पार्टीची कार्यकारिणी जाहीर
पुणे, ता. १ ः भारतीय लोकविकास पार्टीची कार्यकारिणी जाहीर झाली असून प्रा. लक्ष्मीकांत लिंबाजी गरड यांची महाराष्‍ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. कार्याध्यक्ष तुळशीराम बळिराम पवार, सुधीर सोनवणे, मुजीब खान, उपाध्यक्षपदी प्रा.रामदास घोडके, सतीश गरड, सुभाष चव्हाण, राजेशकुमार कुशवाह, कोषाध्यक्षपदी रामसुंदर प्रसाद, सरचिटणीसपदी ॲड. सुभाष भुसारे, डॉ. वसंत गायकवाड, सचिवपदी शहाबाज खान, वसीम शेख, प्रा. रंगनाथ लहाने यांची निवड झाली. तर मुख्य प्रवक्तेपदी महेंद्रसिंग पाटील, प्रवक्ता-प्रा. नितीन जाधव, प्रा. अजय पाटील यांची निवड झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96090 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..