दीड लाख प्रवाशांनी एसटीने गाठले कोकण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीड लाख प्रवाशांनी एसटीने गाठले कोकण
दीड लाख प्रवाशांनी एसटीने गाठले कोकण

दीड लाख प्रवाशांनी एसटीने गाठले कोकण

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः यंदाच्या गणेशोत्सवाने लालपरीला चांगलाच दिलासा दिला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या तीन हजार ४०० एसटी बसमधून सुमारे एक लाख ५४ हजार प्रवाशांनी प्रवास करीत कोकण गाठले. यातून एसटीला तब्बल १० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. हा आकडा गेल्या १० वर्षांत सर्वाधिक आहे. २०१९ च्या गणेशोत्सवावेळी सुमारे एक लाख पाच हजार प्रवाशांनी प्रवास केला होता.
दोन वर्षांत कोरोना निर्बंधामुळे गणेशोत्सव साजरा झाला नव्हता. यंदा तो मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाचे यंदा जादा गाड्यांचे नियोजन केले होते. ३४०० पैकी सुमारे १९०० गाड्यांचे आधीच ग्रुप बुकिंग झाले होते. उर्वरित गाड्यांनाही प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. त्यामुळे यंदा सुमारे एक लाख ५४ हजार प्रवाशांनी एसटीने कोकण गाठले. विसर्जनानंतर एसटी प्रशासन परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करीत आहे. त्यावेळीही एसटीला चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे.

पुणे विभागाच्या २४० गाड्या
पुणे विभागाने यंदा नियमित गाड्यांसह २४० अतिरिक्त गाड्या सोडल्या होत्या. त्यालाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पुणे विभागाच्या गाड्यांतून सुमारे २० हजार प्रवाशांनी प्रवास केला असून यातून पुणे विभागाला पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रनवरे यांनी सांगितले.

यंदा एसटी प्रशासनाने कोकणासाठी तीन हजार ४०० गाड्या सोडल्या होत्या. यातून दीड लाखाहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून जवळपास १० कोटी रुपये इतके उत्पन्न मिळाले. हा आकडा मागील १० वर्षांतील सर्वाधिक आहे.
- शिवाजी जगताप,
सरव्यवस्थापक (वाहतूक), राज्य परिवहन महामंडळ, मुंबई

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96145 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..