ई-डेपोचे आज उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ई-डेपोचे आज उद्‍घाटन
ई-डेपोचे आज उद्‍घाटन

ई-डेपोचे आज उद्‍घाटन

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः पीएमपी पुणे स्टेशनच्या ई-बस डेपोचे उद्या (ता. २ ) उद्‍घाटन होणार आहे. पुणे स्टेशन डेपोच्या ९० बसपैकी २९ बस आधीच वापरात आहेत. त्यामुळे शुक्रवारी उर्वरित ६१ बसचे उद्‍घाटन होईल. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्रनाथ पांडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बस डेपोचे शुक्रवारी दुपारी दोन वाजता उद्‍घाटन होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पुणे स्टेशनच्या ई-बसचे उद्‍घाटन कोणत्या ना कोणत्या कारणाने रखडले होते. अखेर शुक्रवारी या बस डेपोचे उदघाटन होणार आहे. तर शनिवारपासून (ता. ३) या बस प्रवाशांच्या सेवेत धावतील. या सेवेमुळे सुमारे ५५ हजार प्रवाशांची सोय होणार आहे. फेम २ अंतर्गत पीएमपीला एकूण ६५० बस मिळणार आहे. त्यापैकी ३०० बस सध्या रस्त्यावर धावत आहे. शनिवारपासून आणखी ६१ बस प्रवाशांच्या सेवेत धावणार आहेत. उर्वरित बसदेखील टप्प्याटप्याने पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील. शुक्रवारी जरी बसचे उद्‍घाटन झाले तरी त्या शनिवारपासूनच रस्त्यावर धावतील. शनिवारी ६१ बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील, असे पुणे पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96163 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..