पूल पाडण्याचा अहवाल दोन दिवसांत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूल पाडण्याचा अहवाल दोन दिवसांत
पूल पाडण्याचा अहवाल दोन दिवसांत

पूल पाडण्याचा अहवाल दोन दिवसांत

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः चांदणी चौक येथील एनडीए ते पाषाण दरम्यानचा पूल पाडण्यात येणार आहे. गुरुवारी संध्याकाळी नोएडा येथील एडिफिसी इंजिनिअरिंगच्या गटाकडून पुलाची पाहणी करण्यात आली. १५ ते २० मिनिटे पाहणी करून त्याचा अहवाल दोन दिवसांत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिला जाणार आहे. त्यानंतर पूल कोणत्या तारखेला व किती वाजता पाडायचे हे ठरणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन जणांच्या गटाने ही पाहणी केली. या वेळी त्यांनी पुलाची लांबी तसेच त्याचे स्ट्रक्चर कसे आहे, किती गर्डरचा वापर केला आहे हे पहिले. या विषयीची सर्व माहिती घेऊन त्याचा अहवाल दोन दिवसांत दिला जाईल. यासाठी किती क्षमतेचे विस्फोटक वापरले जाईल हे ठरविले जाईल. १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान पूल पाडण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96167 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..