दोन वर्षानंतर आविष्कार स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन वर्षानंतर आविष्कार स्पर्धा
दोन वर्षानंतर आविष्कार स्पर्धा

दोन वर्षानंतर आविष्कार स्पर्धा

sakal_logo
By

पुणे, ता. २ ः विद्यार्थ्यांमधील संशोधन आणि नवविचाराला चालना देणारी आविष्कार स्पर्धा दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा आयोजित केली आहे. यंदा या राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजनाचा मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाला आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्ष ही स्पर्धा होऊ शकली नव्हती.

विद्यापीठातील अंतर्गत गुणवत्ता आणि सिद्धता कक्षाच्या संचालक डॉ. सुप्रिया पाटील म्हणाल्या, ‘‘ही स्पर्धा सुरुवातीला महाविद्यालय स्तरावर, त्यानंतर विभागीय स्तरावर, मग जिल्हा आणि त्यानंतर विद्यापीठ स्तरावर होते. या विद्यापीठ स्तरावरून मग राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत पदवी अभ्यासक्रम शिकणारे, पदव्युत्तर, संशोधनाचे विद्यार्थी तसेच प्राध्यापकदेखील सहभागी होऊ शकतात. यातील विद्यार्थ्यांना रोख पारितोषिकासोबतच शिष्यवृत्तीही देण्यात येते. या वर्षाअखेर अंतिम स्पर्धा होणे अपेक्षित आहे.’’

महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल एस. एम. कृष्णा यांच्या प्रयत्नातून २००६ पासून ही राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धा आयोजित केली जाते. या वर्षीची ‘आविष्कार २०२२’ ही स्पर्धा १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालये, तसेच २५ ते ३० वर्ष जुन्या महाविद्यालयांमध्ये राबविण्यात यावी, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परिपत्रक काढत महाविद्यालयांना केले आहे. याबाबत अधिक माहिती विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येईल, असे सहायक कुलसचिव श्रीकांत गायकवाड यांनी सांगितले.

‘‘मागील दोन वर्ष या स्पर्धा न झाल्याने यंदा मुलांना खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तसेच आयोजनाचा मानही आपल्याला मिळाल्याने विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात यात सहभागी होत विद्यापीठाला आणखी उंचीवर न्यावे.’’
- डॉ. संजीव सोनवणे, प्र- कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

‘‘दरवर्षी विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातून साधारणतः अकराशे विद्यार्थी व प्राध्यापक या स्पर्धेत सहभागी होतात. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षकांनी केलेली अनेक चांगली व समाजोपयोगी संशोधने समोर आली आहेत.’’
- डॉ. सुप्रिया पाटील, संचालक, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96277 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..