महिंद्रा ऑल इंडिया टॅलेंट स्कॉलरशिपची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिंद्रा ऑल इंडिया टॅलेंट स्कॉलरशिपची घोषणा
महिंद्रा ऑल इंडिया टॅलेंट स्कॉलरशिपची घोषणा

महिंद्रा ऑल इंडिया टॅलेंट स्कॉलरशिपची घोषणा

sakal_logo
By

पुणे, ता. २ : के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट (केसीएमईटी)च्या वतीने ऑल इंडिया टॅलेंट स्कॉलरशिप (एमएआयटीएस) २०२२ या आपल्या वार्षिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवले आहेत. मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून रोजगारक्षम पदविका अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या, अल्प-उत्पन्न कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हा या शिष्यवृत्तीचा उद्देश आहे. दरवर्षी १० हजार रुपयांची शिष्यवृत्ती ५५० विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त तीन वर्षे दिली जाते.

या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्याने दहावी किंवा बारावी इयत्तेमध्ये ६० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्याने सरकारी किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक संस्थेमध्ये पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवलेला असला पाहिजे. ही शिष्यवृत्ती अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाच दिली जाईल. संकेतस्थळ https://www.kcmet.org/index.aspx

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96379 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..