आता चऱ्होली, निगडी होणार ई-डेपो ई-बस डेपोचे उद्‌घाटन ः दोन महिन्यांत दोनशे नवे ई-बस येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आता चऱ्होली, निगडी होणार ई-डेपो

ई-बस डेपोचे उद्‌घाटन ः दोन महिन्यांत दोनशे नवे ई-बस येणार
आता चऱ्होली, निगडी होणार ई-डेपो ई-बस डेपोचे उद्‌घाटन ः दोन महिन्यांत दोनशे नवे ई-बस येणार

आता चऱ्होली, निगडी होणार ई-डेपो ई-बस डेपोचे उद्‌घाटन ः दोन महिन्यांत दोनशे नवे ई-बस येणार

sakal_logo
By

पुणे, ता. २ ः पीएमपीच्या पुणे स्टेशन डेपोनंतर आता चऱ्होली व निगडी ई-डेपोचे काम अंतिम टप्यात आले आहे. येथे लागणाऱ्या विजेसाठी केबल टाकण्याचे काम सुरू आहे. शिवाय येत्या दोन महिन्यांत पीएमपीच्या ताफ्यात आणखी दोनशे नवे ई-बस दाखल होणार आहे. त्यामुळे दोन महिन्यांत पीएमपीच्या सुमारे ६५० ई-बस प्रवाशांच्या सेवेत धावताना दिसतील.

पीएमपीच्या पुणे स्टेशन ई-डेपोचे उदघाटन व फेम २अंतर्गत आलेल्या ६१ ई-बसचे लोकार्पण शुक्रवारी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार माधुरी मिसाळ, संजय जगताप, राहुल कुल, सुनील कांबळे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अजित शिंदे, जगदीश मुळीक, डॉ. चेतना केरुरे,आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. यावेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्रनाथ पांडे व प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पीएमपीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले. वसुंधरा काशीकर यांनी सूत्रसंचालन केले.

मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही
मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही. लोकसभेची निवडणूक लढविणार नाही. मी तुम्हाला राज्यात नको आहे का? असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या पालकमंत्री होणार नसल्याचे स्पष्ट केले.

चार्जिंग स्टेशन सोलरवर आले पाहिजे
पुणे सहा राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पर्यायी ऊर्जेवर शिफ्ट झाली पाहिजे. पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत आपण सीएनजी व ई-ऊर्जेवर आलो ही चांगली बाब आहे. पीएमपीचे चार्जिंग स्टेशन हे सोलर वर विकसित झाले पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.

काय म्हणाले डॉ महेंद्रनाथ पांडे :
केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे म्हणाले, ‘‘वाहनांचे चार्जिंग अति वेगवान झाले पाहिजे. त्यासाठी पुण्यातील ‘एआरएआय’ ही संस्था काम करीत आहे. ते काम देखील पूर्ण झाले आहे. हरित ऊर्जा देशाला सामर्थ्यवान बनवीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकत आहे. २०३० पर्यंत ४५ टक्केपर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96519 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..