मोझे प्रशालेत पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोझे प्रशालेत पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना
मोझे प्रशालेत पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना

मोझे प्रशालेत पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना

sakal_logo
By

पुणे : गेनबा सोपानराव मोझे प्राथमिक प्रशालेत पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. विद्यार्थी व पालक यांच्यासह सर्वांनाच पर्यावरणाचा संदेश देण्यासाठीच विद्यालयात पर्यावरणपूरक गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्याचबरोबर गणपतीच्या विविध नावांसह व मोदकांसह २१ मूषकराजची प्रतिकृती साकारून गणेशाची आरास करण्यात आली. शाळेत गणेश चित्राची रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यातील सुंदर व आकर्षक चित्रे मंडपात लावण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर विद्यालयात गणपती गीतगायन व नृत्य या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ मोझे, शालेय समिती अध्यक्षा अलका पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोझे व सदस्य संजय मोझे आणि मुख्याध्यापक सुधीर शिंगटे यांच्या नियोजनाखाली गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96782 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..