क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम
क्राईम

क्राईम

sakal_logo
By

कात्रज परिसरात सोन्याचे दागिने लंपास

पुणे, ता. ३ ः घराचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्यांनी कपाटातील दोन लाख ९५ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना कात्रज भागात घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी बिबवेवाडीमध्ये राहायला असून त्यांचे कात्रज भागातील शेलारमळा परिसरात घर आहेत. चोरट्यांनी बनावट चावीने घराचे कुलूप उघडून सोन्याचे दागिने लंपास केले.
..........

बनावट प्रमाणपत्रद्वारे पेन्शन घेणाऱ्या महिलेवर गुन्हा

पुणे, ता. ३ ः रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बॅंकिंगमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असतानाही त्यांचे जिवंत असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून पेन्शन घेतल्याने पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राजी पद्मनाभन (रा. वडाळा, मुंबई) असे गुन्‍हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बॅंकिंगच्या महाव्यवस्थापक अंजली कार्येकर यांनी चतुःश्रृंगी पोलिस फिर्याद दिली आहे. पतीच्या निधनानंतर तब्बल दीड वर्षांनी हा प्रकार उघडकीस आला आहे. के. पी. पद्मनाभन हे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया येथे कर्मचारी होते. त्यांचे निधन १४ जून २०१८ रोजी झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी राजी यांनी त्यांचे जिवंत असल्याचे प्रमाणपत्र सादर करून बॅंकेची ८ लाख ४६ हजार ५९२ रुपयांची फसवणूक केली.


वाहनचोरीचा गुन्हा २४ तासांत उघड
पुणे,ता. ३ ः दुचाकीची चोरी करणाऱ्याला शिवाजीनगर पोलिसांनी २४ तासांच्याआत अटक केली. त्याच्याकडून १५ हजार रुपये किमतीची मोटार सायकल ताब्यात घेण्यात आली आहे.
आमीरली वाहबअली शेख (रा. पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांना २५ ते २६ वर्षीय तरुण बीना चावीची गाडी ढेंगले पूल येथून मंगला टॉकिजकडे ढकलत घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. एमएच- १२ सीएन - ९३१ या क्रमांकाची गाडी महानगरपालिकेसमोरील खुडे पुलाखालील अंडाभुर्जीच्या हातगाडी शेजारून चोरली असल्याचे त्याने कबूल केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96789 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..