दिव्यांग विद्यार्थ्यांची समूहगीत स्पर्धा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग विद्यार्थ्यांची समूहगीत स्पर्धा उत्साहात
दिव्यांग विद्यार्थ्यांची समूहगीत स्पर्धा उत्साहात

दिव्यांग विद्यार्थ्यांची समूहगीत स्पर्धा उत्साहात

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः लायन्स क्लब ऑफ पूना वेस्टतर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित समूहगीत स्पर्धा उत्साहात झाली. यंदाच्या वर्षी स्पर्धेत एकूण १५ शाळा व कार्यशाळा वर्ग सहभागी झाले होते. यावर्षी प्रथमच प्रौढ मतिमंदांचे दोन गट सहभागी झाले होते.

‘स्वरबंध’ संगीत कार्यक्रमाचे संचालक धनंजय आपटे व कवयित्री अर्चना गौरकर यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमास लायन्स क्लब प्राईमचे माजी प्रांतपाल राजकुमार राठोड, माजी प्रांतपाल आणि ट्वेन्टी फर्स्ट सेंचुरीचे चंद्रहास शेट्टी, झोन चेअरमन पल्लवी देशमुख, स्पर्धा प्रमुख सीमा दाबके आदी उपस्थित होते. शाळा गटातून क्रमांक सेवासदन दिव्यांग शाळेने, कार्यशाळा गटातून माधुरी ओगले आणि पुनर्वसन केंद्र प्रौढ मतिमंदमधून जीवनज्योत या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना लायन्स क्लब ऑफ पूना वेस्टतर्फे भेटवस्तू दिली. प्रतिभा खंडागळे यांनी सूत्रसंचालन केले. स्मिता देव यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96802 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..