पुणे रेल्वे विभागाकडून दीड कोटींचा दंड वसूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे रेल्वे विभागाकडून 
दीड कोटींचा दंड वसूल
पुणे रेल्वे विभागाकडून दीड कोटींचा दंड वसूल

पुणे रेल्वे विभागाकडून दीड कोटींचा दंड वसूल

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः पुणे रेल्वे विभागात ऑगस्ट महिन्यात विना तिकीट प्रवास करताना १९ हजार ३०९ प्रवासी आढळून आले. त्यांच्याकडून सुमारे एक कोटी ४४ लाख रुपयांचा दंड वसूल केला. तसेच १५२४ प्रवाशांना अनियमित प्रवास केल्याने त्यांच्याकडून आठ लाख २६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाणिज्य विभागाने ही कारवाई केली आहे.

पुणे विभागांत विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चाप बसावा म्हणून रेल्वे प्रशासन सातत्याने कारवाई करीत आहे. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे व विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांनी यासाठी विशेष मोहीम आखली आहे. त्यासाठी वेग वेगळ्या स्थानकांवर, वेग वेगळी रेल्वे गाड्या तपासण्याचे आदेश तिकीट निरीक्षक व तिकीट पर्यवेक्षक यांना दिले आहे. त्यानुसार ही कारवाई सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात १९ हजार ३०९ प्रवाशांवर कारवाई केली आहे. तर एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत एक लाख ४६ हजार प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून दहा कोटी दहा लाख २२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96808 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..