तक्रार निवारणासाठी डाक अदालत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तक्रार निवारणासाठी डाक अदालत
तक्रार निवारणासाठी डाक अदालत

तक्रार निवारणासाठी डाक अदालत

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः कात्रज, धनकवडी, सिंहगड रोड, पुणे शहर, गणेशखिंड, डेक्कन जिमखाना व कोथरूड आदी पोस्ट ऑफिसच्या सेवा संदर्भातील तक्रारीचे निवारण करण्यासाठी २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता डाक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्याच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींचे या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल काउंटरसेवा रजिस्टर व पार्सल, बचत बॅंक व मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी घेतल्या जाणार आहेत. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्यांचे नाव व हद्द आदी संबंधितांनी डाक सेवा बाबतची तक्रार डॉ. अभिजित दि इनके, प्रवर पुणे शहर पश्चिम विभाग, पुणे ४११०३० यांचे कार्यालय, अधिक्षक डाकघर, लोकमान्यनगर पोस्ट ऑफिस इमारत, पुणे ४११०३० यांच्या नावे अतिरिक्त प्रतीसह १५ सप्टेंबरपर्यंत पाठवावी, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96818 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..