पत्नीला पोटगी, घरभाडे देण्याचे न्यायालयाचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्नीला पोटगी, घरभाडे देण्याचे न्यायालयाचे आदेश
पत्नीला पोटगी, घरभाडे देण्याचे न्यायालयाचे आदेश

पत्नीला पोटगी, घरभाडे देण्याचे न्यायालयाचे आदेश

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : लग्नात कमी हुंडा दिला आणि मुलगी झाली म्हणून छळ झालेल्या पत्नीला दरमहा अंतरिम स्वरूपात २७ हजार रूपये पोटगी आणि घरभाडे देण्याचे आदेश न्यायालयाने पतीला दिले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. पी. शेळके यांनी हा आदेश दिला.

दर महिन्याच्या दहाव्या दिवशी अंतरिम पोटगी आणि घरभाड्याची रक्कम पतीने जमा करावी, तसेच सासरच्या मंडळींनी तक्रारदार महिला आणि तिच्या मुलीला कोणताही त्रास देऊ नये, असे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे. या प्रकरणात पीडित पत्नीने पतीसह सासरच्या मंडळींविरोधात २७ नोव्हेंबर २०१३ रोजी चाकण पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. या प्रकरणातील जोडप्याचे १७ जानेवारी २०१३ रोजी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगी आहे. पुरेसा हुंडा न दिल्याने पतीसह सासरची मंडळी महिलेला मारहाण करायचे. हा छळ असह्य झाल्यावर महिलेने पोलिसात धाव घेतली. सासरी होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून महिला आपल्या मुलीसह भाडेतत्वावर घेतलेल्या घरात स्वतंत्रपणे राहात आहे. उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे पतीने आपली देखभाल आणि मुलीच्या शिक्षण-संगोपनासाठी पोटगी व घरभाडे द्यावे, असा अर्ज तिने ॲड . जयपाल पाटील आणि ॲड . श्रद्धा सोट यांच्यामार्फत न्यायालयात दाखल केला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96826 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..