अवतीभवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवतीभवती
अवतीभवती

अवतीभवती

sakal_logo
By

तीन लाख मेडिकल ग्रेड मास्कचे वाटप
पुणे ः लायन्स क्लब ऑफ पुणे फ्युचरतर्फे केईएम हॉस्पिटल, पुणे पोलिस व ससून हॉस्पिटलला प्रत्येकी एक लाख मेडिकल ग्रेड मास्कचे वाटप केले. केईएम हॉस्पिटलमध्ये झालेल्या विशेष कार्यक्रमास लायन्स इंटरनॅशनलचे माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, केईएम हॉस्पिटलचे वैद्यकीय व्यवस्थापक डॉ. विश्‍वनाथ येमुल, वरिष्ठ उपवैद्यकीय व्यवस्थापक डॉ. मधुर राव, लायन्स क्लब ऑफ पुणे फ्युचरच्या अध्यक्ष वृषाली गानू, सचिव अ‍ॅड. तनय देशमुख, खजिनदार राहुल बेद्रे, लायन्स क्लबचे उपक्रम समन्वयक अशोक मिस्त्री आदी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर हा उपक्रम हाती घेतला. यासाठी हिमाचल प्रदेश येथील मास्क लॅबने आपल्या सीएसआर उपक्रमांतर्गत लायन्स क्लबला सहकार्य केले.

निर्माल्य संकलनाचा आज कार्यक्रम
पुणे ः पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश उत्सवामध्ये निर्माल्य संकलन कार्यक्रमाचे सोमवारी (ता. ५) आयोजन करण्यात आले आहे.
शिवाजीनगरमधील कॉंग्रेस भवन समोर वृध्देश्वर, सिध्देश्वर घाट येथे दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत तसेच ९ सप्टेंबर रोजी कोहिनूर टेक्निकल इन्स्टीटयुट जवळ झेड ब्रिज डेक्कन जिमखाना येथे दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत निर्माल्य संकलन होणार आहे. इच्छुक स्वयंसेवकांनी सहभागी होण्याचे आवाहन धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.


तीन मंडळांसमोर आरोग्य शिबिरे

पुणे : इंडियन प्रोस्थोडोंटिक सोसायटी पुणे शाखेच्या सुवर्ण महोत्सवास प्रारंभ झाला. त्यानिमित्त पुण्यातील तीन गणपती मंडळांसमोर दंत तपासणी, रक्त शर्करा तपासणी शिबिरांचे, जनजागृती मोहिमेचे आयोजन केले. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळ पहिल्या शिबिराचे उद्‍घाटन झाले. या शिबिरामध्ये १२५ रुग्णांची तपासणी केली. पहिल्या शिबिराच्या उद्‍घाटनावेळी इंडियन प्रोस्थोडोंटिक सोसायटी पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. भूषण बांगर, डॉ. प्रियम आदित्य, डॉ. विजय मब्रूकर, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश उत्सव ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे आदी उपस्थित होते. भोलेनाथ मित्र मंडळ नारायण पेठ येथे अध्यक्ष दीपक मानकर यांच्या उपस्थितीत आणि त्यानंतर कामाठीपुरा सार्वजनिक उत्सव मंडळ (कॅम्प) येथे अध्यक्ष प्रसाद केदारी यांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी शिबिर झाले.

मेट्रो स्थानकावर आज शिक्षकदिन
पुणे ः शिक्षक दिनानिमित्त (ता. ५) लायन्स क्लब ऑफ पुणे तळवडे प्राईड यांच्या सौजन्याने वंडर स्टार्स सिम्फनी हा विशेष मुलांचा सहभाग असलेला एक आगळा वेगळा कार्यक्रम पुणे मेट्रो आणि वैद्य नानल आयुर्वेद यांच्या सहकार्याने आयोजित केला आहे. या कार्यक्रमात पुणे शहरातील बाल कल्याण संस्था, अभिसार फाऊंडेशन वाकड, कामयनी, सिंधू विद्याभवन औंध अशा अनेक विशेष मुलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांमधील शिक्षकांना गौरविण्यात येणार आहे. गरवारे कॉलेज मेट्रो स्थानकावर सोमवारी दुपारी ३ वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात १५ विशेष मुले-मुली विविध गाणी सादर करणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहून विशेष मुलांना प्रोत्साहन द्यावे, असे संयोजक लक्ष्मीकांत गुंड आणि पृथ्वी थिएटर्स यांनी केले आहे. सेलिब्रशन ऑन व्हील्स या संकल्पनेअंतर्गत हा कार्यक्रम होत आहे. त्यानंतर विशेष मुले व शिक्षकांना मेट्रो सफरही घडवून आणणार आहे.

बाल मधुमेंहीसाठी आज शिबिर
पुणे ः अनुयश आरोग्य प्रतिष्ठानतर्फे बाल मधुमेह दत्तक योजना सोमवारी (ता. ५) राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत डॉ. रवींद्र नांदेडकर यांच्या संशोधनातून तयार झालेले औषध बाल मधुमेहींना त्यांच्या वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत मोफत घरपोच निःशुल्क औषध पाठवले जाते. देशभरातील १२५० बाल मधुमेही या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेत आता आणखी ५२ बाल मधुमेहींना सहभागी करून घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ समाजसेविका आणि माहेर संस्थेच्या संस्थापक-संचालक लुसी कुरियन भूषविणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगदाळे आणि एम. आय. टी. विश्वशांती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मिलींद पांडे उपस्थित राहणार आहेत. सेनापती बापट रस्त्यावरील एमसीसीआयए ट्रेड टॉवरमध्ये सुमंत मुळगावकर सभागृहात सोमवारी सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होईल. या प्रसंगी या प्रसंगी मधुमेह मुक्त भारत अभियानात कार्यरत असलेले प्रचारक संदीप मुळे व डॉ. नरेंद्र पाटील यांना ‘आदर्श आरोग्य शिक्षक’ या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96879 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..