क्राईम (दोन बातम्या) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम (दोन बातम्या)
क्राईम (दोन बातम्या)

क्राईम (दोन बातम्या)

sakal_logo
By

पीएमपी बस चालकाला मारहाण

पुणे, ता. ४ ः शंकरशेठ रस्त्यावरील सेव्हन लव्ह चौकात पीएमपी चालकाला चार जणांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. २) संध्याकाळी ७.३० वाजता घडली.

निखिल राजेश कटके, धनंजय निखिल कटके, नितीन जयपाल कटके, कविता राजेश कटके (चौघे रा. गुलटेकडी) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. लक्ष्मण धुमाळ (वय ४१, रा. कात्रज) या बस चालकाने फिर्याद दाखल केली आहे. मार्ग क्रमांक २९/१० ही पीएमपीची बस आळंदी ते स्वारगेट या मार्गावर जात होती. मीरा सोसायटी सेव्हन लव्ह चौकात वाहतूक कोंडी असल्याने तसेच सिग्नल लागला असल्याने चालक बस बंद करून थांबले होते. आरोपी निखिल रस्‍त्याच्या पलीकडून त्याची कार घेऊन आला. बससमोर कार आडवी लावून त्याने चालकाला शिवीगाळ केली. तेव्हा चालकाने शिवीगाळ कारण विचारले असता, ‘आज तुझी गाडीच फोडतो’ अशी धमकी त्याने दिली. दरम्यान आरोपीने त्याच्या साथीदारांना बोलावले. महिला पुरुषांनी बसमध्ये चढून चालकाला हाताने, चपलेने, जड वस्तूने गालावर, पाठीवर, छातीवर, पोटात मारहाण केली.

विनयभंगप्रकरणी सांगलीच्या डॉक्टरला अटक

पुणे, ता. ४ ः लग्नाची मागणी करून अश्लील वर्तन करत एका महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याबद्दल, तसेच चार लाखांची फसवणूक केल्याबद्दल इम्रान इलाही मुलाणी (वय ४१, रा. सांगली) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत एका ३१ वर्षीय महिलेने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार रूबी रुग्णालयाच्या गेटबाहेर ४ ऑक्टोबर २०१९ तसेच १६ ऑगस्ट २०२१ रोजी घडला होता. फिर्यादी यांना लग्नाची घातली असता त्यांनी नकार दिला. त्यावर आरोपीने अश्लील वर्तन केले, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीने फिर्यादी यांच्या नावावर २०१९ मध्ये ४ लाख ७ हजार ५३२ रुपयांचे वैयक्तीक कर्ज घेतले. आरोपीने कर्जाचे हप्ते भरणे बंद केले असून ३ लाख ८५ हजार रुपये भरायला लावून फिर्यादीची फसवणूक केली,असे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96885 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..