मराठीच्या अध्यादेशातच त्रुटी दूर करण्याची मनसेची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठीच्या अध्यादेशातच त्रुटी दूर करण्याची मनसेची मागणी
मराठीच्या अध्यादेशातच त्रुटी दूर करण्याची मनसेची मागणी

मराठीच्या अध्यादेशातच त्रुटी दूर करण्याची मनसेची मागणी

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः दुकाने, व्यावसायिक कार्यालये यांच्यावर मराठी भाषेतच फलक लावण्याच्या राज्य सरकारच्या तत्कालीन आदेशातील त्रुटी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १७ मार्च रोजी आदेश दिला. त्यानुसार शासकीय अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला. परंतु, त्या आदेशात अनेक त्रुटी असल्यामुळे मराठीची अस्मिता कशी जपणार, असा प्रश्न मनसेचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते हेमंत संभूस यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारचा आदेशही इंग्रजी भाषेत असल्यामुळे मराठीची गळचेपी होत असून मागच्या सरकारने केलेल्या चुका, सुधारित अध्यादेश काढून दुरुस्त कराव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे.

अध्यादेशानुसार मराठी भाषेतील नाव इतर भाषेपेक्षा मोठे असावे. परंतु, अनेक कंपन्या इंग्रजी भाषेतील नाव मोठ्या आकारात व मराठीत नाव छोट्या आकारात लिहितात. त्यांच्यावर कारवाई कशी होणार, याचे स्पष्टीकरण नसल्याचे संभूस यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97052 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..