शिवसेना जिल्हाप्रमुखावर अदखलपात्र गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना जिल्हाप्रमुखावर अदखलपात्र गुन्हा
शिवसेना जिल्हाप्रमुखावर अदखलपात्र गुन्हा

शिवसेना जिल्हाप्रमुखावर अदखलपात्र गुन्हा

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः बाबूराव चांदेरे यांचे बाणेर येथील जनसंपर्क कार्यालय तोडून टाका अन्यथा तुम्ही या भागात कसे राहता ते बघतो, अशी धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्यावर चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
नीलेश विजय फसले (२७, रा. वीरभद्रनगर, बाणेर, धंदा, ड्रायव्हर) यांनी फिर्याद दिली आहे. नीलेश आणि बाळासाहेब चांदेरे एकमेकांचे ओळखीचे असून नीलेश हा बाळासाहेब चांदेरे यांच्याकडे बदली चालक म्हणून काम करतो. २ सप्टेंबर रोजी रात्री बाळासाहेब चांदेरे यांनी नीलेश आणि त्याचा साथीदार जुबेर यांना बाणेर मधील बाबूराव चांदेरे यांचे जनसंपर्क कार्यालय फोडण्याचे सांगून त्यातील कागदपत्रे माझ्याकडे आणून द्या, असे सांगितले. यासाठी ५० हजार देण्याची तयारी दाखवली. तसेच, जर काम केले नाही तर तुम्ही या भागात कसे राहता ते बघतो असे म्हणून धमकी दिल्याचे या फिर्यादीत नमूद केले आहे.

याबाबत बाळासाहेब चांदेरे यांनी सांगितले की, ‘‘ही एक राजकीय खेळी आहे. विरोधकांनी माझ्या चालकाला मारहाण करून खोटी तक्रार दाखल करण्यास सांगितले. असा कोणताही प्रकार घडला नाही. राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. समोर निवडणूका येणार असल्याने केवळ माझी बदनामी करण्यासाठी खोटी फिर्याद दिली आहे’’.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97081 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..