सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूमुळे पुण्यातील उद्योजक हळहळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूमुळे पुण्यातील उद्योजक हळहळले
सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूमुळे पुण्यातील उद्योजक हळहळले

सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूमुळे पुण्यातील उद्योजक हळहळले

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः अपघातात एका मोठ्या उद्योजकाचा मृत्यू होणे, ही खरोखरच दुर्दैवी बाब आहे. सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूमुळे अवघ्या उद्योग विश्वाचीच हानी झाली, अशी भावना शहरातील उद्योग-सेवा क्षेत्रातून रविवारी उमटली.

उद्योजक सायरस मिस्त्री यांचा अपघातात ठाणे जिल्ह्यातील पालघर येथे मृत्यू झाला. मिस्त्री यांचे कोरेगाव पार्कमध्ये एक घर होते. तसेच त्यांचा मित्र परिवारही येथे होता. त्यामुळे त्यांचे पुण्यातही येणे-जाणे होते. या पार्श्वभूमीवर मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲंड ॲग्रिकल्चरचे (एमसीसीआयए) अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता म्हणाले, ‘‘मिस्त्री यांच्यासारख्या उमद्या उद्योजकाचा असा अकाली अंत होणे, ही धक्कादायक घटना आहे. पारशी समाजाचेच नव्हे तर, देशातील उद्योग वर्गाचे त्यांच्या अकाली मृत्युमुळे नुकसान झाले आहे. सायरस हे सामाजिक कार्यातही सहभागी होते. कॉर्पोरेट व्हॅल्यू ते जपत.’’
प्राज इंडस्ट्रीजचे डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, ‘‘मिस्त्री यांच्या अकाली मृत्यूचा धक्का उद्योग क्षेत्राला बसला आहे. ते उमदे उद्योजक होते. जागतिक महासत्ता होण्याची आपल्या देशाची क्षमता आहे, यावर त्यांचा विश्वास होता.’’
‘केपीआयटी’चे अध्यक्ष रवी पंडित म्हणाले, ‘‘देशाच्या विकासात उद्योजकांचा मोठा सहभाग असतो. त्यामुळे मिस्त्री यांच्यासारख्या उमद्या उद्योजकाचा अपघाती मृत्यू, ही मनाला चटका लावणारी घटना आहे.’’
‘एमसीसीआय’चे महासंचालक प्रशांत गिरबने म्हणाले, ‘‘मिस्त्री यांचा असा मृत्यू होणे, ही धक्कादायक बाब आहे. या घटनेच्या निमित्ताने देशातील वाहतूक सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्याचा सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97101 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..