समाजपुरूषांच्या प्रबोधनाची परंपरा कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाजपुरूषांच्या प्रबोधनाची परंपरा कायम
समाजपुरूषांच्या प्रबोधनाची परंपरा कायम

समाजपुरूषांच्या प्रबोधनाची परंपरा कायम

sakal_logo
By

पुणे, ता. ५ ः वाल्ह्याचा वाल्मीकी होण्याची पुराणकथा असो की, ‘तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूँगा ही सिंहगर्जना करणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची शौर्यगाथा. एवढंच काय कर्नाटकातील हंपी रथ असो की, हिमालयातील केदारेश्वर मंदिर... हिंदू धर्मशास्रातील पुराणकथांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वधर्म समभावाच्या शिकवणी पर्यंत.. गणेशोत्सवातील देखाव्यांनी आजही समाजपुरूषांच्या प्रबोधनाची परंपरा कायम ठेवली आहे.
पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांबरोबरच सर्वात जुनी नावाजलेली गणपती मंडळे ही कसबा पेठ, मंगळवार पेठ आणि बुधवार पेठेचे वैशिष्ट्ये. दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ मॉ साहेबांच्या हस्ते स्थापन झालेला कसबा गणपतीही याच परिसरात आहे. मानाच्या पहिल्या कसबा गणपती बरोबरच मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी, मानाचा तिसरा गुरुजी तालीम, मानाचा चौथा तुळशीबाग गणपती हा या पेठांचा अभिमान! केवळ धार्मिक अधिष्ठानाच्या पुढे जात समाजप्रबोधनाची परंपरा या मंडळानी कायम जोपासली आहे. स्वदेश सेवेचा हा सार्वजनिक महायज्ञ आकर्षक देखाव्यांतून कायम जोपासण्यात आला आहे.

आवर्जून पाहा
आझाद हिंद सेनेचे शौर्य गाथा
साईनाथ मंडळ ट्रस्टने नेतांजीच्या जीवनावरील जिवंत देखावा अर्थात छोटीशी नाटिका सादर केली आहे. नेताजींचे स्वातंत्र्याचे स्वप्न आणि त्यांनी देशवासीयांना केलेले आवाहन आझाद हिंद फौजेच्या लढ्यातून उलगडण्यात आले आहे.

शिवरायांची न्यायनीती
छत्रपतींच्या न्यायनीतीचे आदर्श उलगडणारी छोटीशी नाटिका फणी आळी तालीम मंडळाने सादर केली आहे. अफजलखानाच्या वधानंतर त्याच्याशी संपलेले वैर आणि त्याच्या मुलांना दिलेली न्यायाची वागणूक अभिनयातून सादर केली आहे.

देशी खेळांना प्रोत्साहन
मोबाईलच्या जंजाळात अडकलेल्या युवकांना देशी खेळाचे प्रोत्साहन देण्यासाठी श्रीराम अभिमन्यू मंडळाने ‘बलसागर भारत होवो’ ही नाटिका सादर केली आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम
मंगळवार पेठेतील मंगल मित्र मंडळाने अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विधायक मित्र मंडळाने भारतीय सणांची आणि संस्कृतीची ओळख मांडणाऱ्या सजीव देखाव्याचे सादरीकरण केले आहे. तर राष्ट्रीय साततोटी हौद मित्र मंडळाने महापुरुषांची ओळख करून देणारा ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोसता हमारा’ ही नाटिका सादर केली आहे.

हंपी रथ
भारतीय वास्तुशील्पाचा अतुल्य नमुना असलेले कर्नाटकातील हंपी रथ जनार्दन पवळे मंडळाने साकारला आहे. विशेष म्हणजे यासाठी माती, लाकूड, फायबर, धातू अशा विविध सामग्रीचा वापर केला आहे.

मानाचे पहिले चार गणपती ः
१) कसबा गणपती ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देखावा
२) तांबडी जोगेश्वरी ः आकर्षक विद्यूत सजावटीसह ऑनलाइन संवाद संमेलन
३) गुरुजी तालीम मंडळ ः कोकणातील कौलारू गणेश मंदिर साकारले
४) श्री तुळशीबाग गणपती ः दाक्षिणात्य स्वानंदपुरमचे शिल्प

महत्त्वाचे मंडळ आणि देखावे
बुधवार पेठ ः
- गणेश आझाद मित्र मंडळ ः गजमहाल
- बालविकास मंडळ ः वाल्ह्याचा वाल्मीकी हलता देखावा
- करळेवाडी सार्वजनिक मंडळ ः ज्वालासुर राक्षसाचा वध
- शिवशक्ती मंडळ ः कृत्रिम फुलांची काल्पनिक सजावट
- नाना हौद तरुण मित्र मंडळ ः आकर्षक विद्यूत रोषणाई

कसबा पेठ परिसर ः
- नेहरू तरुण मंडळ ः काल्पनिक गणेश मंदिराची विद्युत रोषणाई
- वज्रदेही मंडळ, उदय मंडळ, भारतमाता मित्र मंडळ ः आकर्षक सजावट
- श्री सुयोग मित्र मंडळ संयुक्त श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ ट्रस्ट ः काल्पनिक महाल (८९२९९)
- श्री हणुमान मंडळ प्रतिष्ठाण ः कुंभकर्णाचा वध

मंगळवार, सोमवार-रास्ता पेठ ः
- दारूवाला पूल मंडळ ः शंकर महाराज देखावा
- सूर्योदय मित्रमंडळ कबड्डी संघ ः गणेशाची पृथ्वी प्रदक्षिणा (हलता देखावा)
- अश्विनी मित्र मंडळ ः बाहुल्यांचा खेळ
- सत्यज्योत मंडळ ः मंदिराचा जीर्णोद्धार, रक्तदान शिबीराचे आयोजन
- संग्राम दशभुजा गणपती मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ, समस्त भोईराज मित्र मंडळ, हुतात्मा भगतसिंग मित्रमंडळ ः आकर्षक रोषणाई
- त्वाष्टा कासार समाज संस्था ः डीआरडीओच्या अर्जुन रणगाड्यांचा देखावा
- तांबट हौद प्रभात मंडळ ः कस्तुरी महल
- ऑस्कर मित्र मंडळ ः पावनखिंड रणसंग्रांम
- नवग्रह मित्र मंडळ ः केदारनाथ मंदिर

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97203 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..