पुणे : कॅबची मध्यवर्ती भागाकडे गर्दीमुळे पाठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cab
उपनगरांकडे कॅबची धाव

पुणे : कॅबची मध्यवर्ती भागाकडे गर्दीमुळे पाठ

पुणे - मी शनिवार पेठेत राहते. कामानिमित्ताने मला हडपसरला जायचे होते. कॅब बुक करतेवेळी कॅब चालक माझं बुकिंग नाकारत होते. हे तब्बल चार वेळा घडले. शेवटी मी मैत्रिणीला बोलावून घेतले आणि तिच्या गाडीवरून हडपसरला गेले असल्याचा अनुभव प्राजक्तानी सांगितला. हाच अनुभव आता पेठेत राहणाऱ्यांनाही येत आहे.

शहरात वाढणाऱ्या गर्दीमुळे कॅब चालकांना मध्य भागात सेवा देण्यास अडचणी येत आहेत. परिणामी, कॅब चालकांनी मध्य भाग सोडून उपनगरांकडे धाव घेतली आहे. पुण्यातील सुमारे ९० टक्के कॅब चालक उपनगरात व्यवसाय करीत आहे तर दुसरीकडे मध्य भागात पीएमपीच्या रद्द झालेल्या फेऱ्या, कॅब चालकांनी फिरविलेली पाठ, रिक्षांचे दर यामुळे प्रवासी मेटाकुटीला आले आहेत.

शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता दुपारपासूनच बंद करण्यात आला. त्यामुळे शनिवार पेठ, रविवार पेठ, बुधवार पेठ, सदाशिव पेठेत मोठी गर्दी होत आहे. रस्ते बंद झाल्याने पीएमपीला दररोज सुमारे २५० फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. याचाही मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. २५० फेऱ्या रद्द झाल्याने रोज सुमारे सव्वा दोन लाख प्रवाशांची गैरसोय होत आहे. १० रूपयांत होणाऱ्या प्रवासासाठी ४० ते ५० रुपये मोजावे लागत आहे.

उपनगरांत ९० टक्के कॅब

पुणे शहरात सुमारे २२ हजार कॅब आहेत. त्यापैकी ९० टक्के कॅब उपनगरात धावत आहेत, तर उर्वरित १० टक्के कॅब शहराच्या मध्यवर्ती भागात धावतात. यातदेखील पुणे रेल्वे स्टेशन, स्वारगेट बस स्थानक आदी ठिकाणी कॅबची संख्या अधिक आहे. बाकीच्या ठिकाणी कॅबच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. उपनगरात मात्र कॅब सुसाट आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी कॅबचे बुकिंग वाढले आहे. मध्य भागात देखावे पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कॅब बुकिंगमध्ये वाढ झाली आहे.

पार्सल सेवेवरही परिणाम

ऑनलाइन मागविलेल्या वस्तूची डिलिव्हरी चार ते पाच दिवसांच्या उशिराने होत आहे. मध्यवर्ती भागात गर्दी असल्याने ग्राहकांना वस्तूंची डिलिव्हरी देण्यास उशीर होत असल्याचे संदेश संबंधित ग्राहकांना येत आहेत. वस्तू चार ते पाच दिवस उशिराने मिळत असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97322 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneE cab