मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार
मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार

मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार

sakal_logo
By

पुणे, ता. ५ ः गणेश विसर्जनापर्यंत शहरासह जिल्ह्यात विशेषतः घाटमाथ्यावर पाऊस चांगलाच सक्रिय होण्याची शक्यता आहे. दिवसभर आकाश सामान्यतः ढगाळ, दुपारनंतर एक-दोन हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच, गुरुवारनंतर (ता. ८) घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

पूर्वमध्य बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांमुळे बुधवारपर्यंत (ता. ७) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील कमाल तापमानात झालेली वाढ आणि बाष्पयुक्त हवेमुळे राज्यात पुढील काही दिवसांत पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्याच्या सध्या वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत असून, उन्हाचा चटका आणि उकाडाही वाढला आहे. मंगळवारी (ता. ६) विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात विजांसह पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहून, ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97460 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..