भरतीच्या परीक्षेची तारखा आठवड्याभरात स्पष्ट होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भरतीच्या परीक्षेची तारखा आठवड्याभरात स्पष्ट होणार
भरतीच्या परीक्षेची तारखा आठवड्याभरात स्पष्ट होणार

भरतीच्या परीक्षेची तारखा आठवड्याभरात स्पष्ट होणार

sakal_logo
By

पुणे, ता. ५ ः पुणे महापालिकेच्या ४४८ पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरून घेऊन जवळपास एक महिना होत आला असला तरी अद्याप परीक्षेच्या तारखांबाबत कोणतीही स्पष्टता दिली जात नाही. महापालिकेने यासंदर्भात आयबीपीएस संस्थेला विचारणा केली असून, येत्या आठवड्याभरात महापालिकेला वेळापत्रक कळविले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे महापालिकेत १० वर्षानंतर कायम पदभरतीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य शाखेच्या १३५, यांत्रिकी शाखेच्या ५, वाहतूक नियोजन शाखेच्या ४ जागा आहेत. लिपीकाच्या २००, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदाच्या १०० आणि सहाय्यक विधी अधिकाऱ्याच्या चार अशा एकूण ४४८ जागांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. ही नोकरभरती पालिकेने ‘आयबीपीएस’च्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज भरण्यापासून ते ऑनलाइन परीक्षा घेऊन निकाल लावण्यापर्यंतची प्रक्रिया या संस्थेच्या माध्यमातून केली जाणार आहे. यात महापालिकेचा कोणताही सहभाग नसेल. अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतरही परीक्षेची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. त्याबाबत महापालिकेकडे अनेक उमेदवार विचारणा करत आहेत. ‘आयबीपीएस’ने चार पदांपैकी एक दोन पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक आधी जाहीर करण्याचे पालिकेला कळविले होते, पण यामुळे आणखी गोंधळ उडेल. त्याऐवजी एकाच दिवशी सर्व पदांच्या परीक्षांच्या तारखा व वेळापत्रक महापालिकेला पाठवून द्या असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अर्जांची संख्या, परीक्षा केंद्र असलेल्या शहरांमधील सुविधांनुसार परीक्षेचे नियोजन केले जाणार आहे. त्यानुसार येत्या आठवड्याभरात वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97503 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..