ड्रोनमुळे विक्रमी गावठाण मोजणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ड्रोनमुळे विक्रमी गावठाण मोजणी
ड्रोनमुळे विक्रमी गावठाण मोजणी

ड्रोनमुळे विक्रमी गावठाण मोजणी

sakal_logo
By

पुणे, ता .६ : राज्यात एक वर्षात जेमतेम ६७ गावातील गावठाणाची मोजणी पूर्ण होऊन रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड मिळत होते. मात्र, राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाकडून ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत दिवसाला चौदा, तर वर्षभरात पाच हजार गावांतील जमिनींची मोजणी करून रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचे काम पूर्ण होत आहे. त्यामुळे रहिवाशांना कायदेशीर मालकी हक्कचा पुरावा मिळू लागला आहे.

१९६० ते २०२० पर्यंत राज्यातील केवळ चार हजार गावातील नागरिकांना आतापर्यंत प्रॉपर्टी कार्ड मिळाले होते. भूमी अभिलेख विभागाने ड्रोनद्वारे गावठाण मोजणीचा निर्णय घेतल्याने गेल्या वर्षभरात ५,११८ गावांच्या गावठाणाच्या मोजणीचा विक्रम केला. तर पाच लाख ८८ हजार ५५१ नागरिकांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप केले गेले. डिसेंबरपर्यंत दहा लाख रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्याचे नियोजन असल्याचे भूमि अभिलेख विभागाचे उपसंचालक किशोर तवरेज यांनी सांगितले. या योजनेमुळे गावातील अतिक्रमणे, जमिनीच्या वादासह अनेक प्रश्‍न सुटण्यास मदत झाली आहे.

गावठाण मोजणीसाठी सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदत घेण्यात आली होती. पुरंदर तालुक्‍यातील सोनोरी या गावात प्रायोगिक तत्वावर या कामाची सुरुवात झाली. त्यानंतर राज्यातील सर्व गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. तर सर्व्हे ऑफ इंडियाला ड्रोन वापरासाठी दोन कोटी रूपयांचा निधी देण्यात आला होता.

ड्रोनद्वारे मोजणीचे फायदे
- ड्रोनद्वारे मोजणीमुळे वेळेत बचत
- ड्रोनद्वारे मोजणीची अचूकता अधिक, खर्चात ५० टक्के बचत
- मालमत्तेवर कर्ज घेणे सहज शक्‍य होणार

दृष्टिक्षेपात
- राज्यातील महसूल गावे (गावठाण) - ४२,०००
- ड्रोनद्वारे एका वर्षात गावांची मोजणी - ५,११८
- एकूण मोजणी झालेल्या गावठाणांची संख्या - ९,११८
- प्रॉपर्टी कार्ड मिळालेले रहिवाशी (ग्रामीण) ः ६३ लाखांहून अधिक

विभाग - मोजणी झालेली गावे
- पुणे विभाग - ८६०
- नाशिक विभाग - ६०१
- नागपूर विभाग - १,२१३
- कोकण विभाग - ९५
- औरंगाबाद विभाग - ११३२
- अमरावती विभाग - १२१७

गावाकडील आमच्या जमिनींची मोजणी ड्रोनच्या सहाय्याने मध्यंतरी झाली. त्यानंतर काही दिवसांत प्रॉपर्टी कार्ड मिळाले. त्यामुळे आता कर्ज घेणे सहज शक्य झाले आहे. पूर्वी खूप त्रास सहन करावा लागत होता.
- सचिन गोरे (चाकण)

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97573 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..